लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवतींची प्रसूती करण्यास अनेक खासगी हॉस्पिटल नकार देत असल्याने अडचणीच्या या काळात नातेवाईंकाना ऐनवेळी मेयो, मेडिकलमध्ये नेण्याची वेळ येत आहे. या प्रकारामुळे बाल व माता मृत्यूदर शून्यावर आणण्याच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन यावर तोडगा काढेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्याच्या कालावधीत मेयोमध्ये २१० तर मेडिकलमध्ये १८०वर कोविड पॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसूती झाल्या आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील ६० टक्केप्रसूती नॉर्मल झाल्या हे विशेष. या दोन्ही शासकीय रुग्णालयांनी संशयित व कोविड पॉझिटिव्ह गर्भवतींसाठी त्यांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु शहरात सुरू असलेल्या ३५ वर खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये सर्वच ठिकाणी प्रसूतीची सोय नाही. गर्भवती महिला सुरुवातीपासून ज्या खासगी रुग्णालयातून उपचार घेतात ते रुग्णालयही पॉझिटिव्ह आल्यावर मेयो, मेडिकलमध्ये जाण्यास सांगत आहे. परिणामी, गर्भवतींना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पॉझिटिव्ह गर्भवतींच्या प्रसूतीचे नियोजन व्हावेप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर म्हणाले, कोविड पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करणे व कोविड पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती करणे दोघांमध्ये मोठा फरक आहे. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक राहते. यामुळे बारीकसारीक गोष्टींची दखल घेणे महत्त्वाचे ठरते. यातच खासगी हॉस्पिटलकडे कोविड रुग्णांसाठी मर्यादित खाटा, शस्त्रक्रियागृह व मनुष्यबळ राहत असल्याने काहींचा नाईलाजही होत असावा, म्हणून अशा रुग्णांच्या प्रसूतीचे नियोजन होणे गरजेचे आहे.प्रसूतीच्या १४ दिवसांपूर्वीच चाचणी आवश्यकडॉ. शेंबेकर म्हणाले, ज्या गर्भवतीचे ३२ आठवडे पूर्ण झाले असतील त्यांना कोविड चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. यात संबंधित महिला पॉझिटिव्ह आल्यास व लक्षणे नसल्यास घरीच होम आयसोलेशन करण्यास सांगितले जाते. १४ दिवसानंतर त्या कोरोनामुक्त होत असल्याने त्यांची सामान्य रुग्णांसारखी प्रसूती करता येऊ शकते. संसर्गाचा धोका असाही टाळता येऊ शकतो.
पॉझिटिव्ह गर्भवतींना मेयो, मेडिकलचाच आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 20:59 IST
कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवतींची प्रसूती करण्यास अनेक खासगी हॉस्पिटल नकार देत असल्याने अडचणीच्या या काळात नातेवाईंकाना ऐनवेळी मेयो, मेडिकलमध्ये नेण्याची वेळ येत आहे. या प्रकारामुळे बाल व माता मृत्यूदर शून्यावर आणण्याच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन यावर तोडगा काढेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
पॉझिटिव्ह गर्भवतींना मेयो, मेडिकलचाच आधार
ठळक मुद्देखासगी हॉस्पिटलची ना : प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज