शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेयो, मेडिकल : औषधांच्या तुटवड्याने रुग्ण वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:25 IST

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळाला देऊन दीड वर्षे झालीत. परंतु अद्यापही या महामंडळाकडून पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयो, मेडिकलमध्ये तर जुन्या मागणीनुसार आतापर्यंत केवळ ५० ते ६० टक्केच औषधांचा पुरवठा झाला आहे. परिणामी, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देदीड वर्षात हाफकिनकडून ५० टक्केच औषधांचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी हाफकिन महामंडळाला देऊन दीड वर्षे झालीत. परंतु अद्यापही या महामंडळाकडून पुरवठा सुरळीत झालेला नाही. मेयो, मेडिकलमध्ये तर जुन्या मागणीनुसार आतापर्यंत केवळ ५० ते ६० टक्केच औषधांचा पुरवठा झाला आहे. परिणामी, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.औषधी व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानके यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी व दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होण्यासाठी औषधे व यंत्रसामुग्री खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने जुलै २०१७ रोजी घेतला. राज्यातील प्रत्येक मेडिकलला औषधे व साहित्य खरेदीचा निधी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉपोर्रेशन लिमिटेड’कडे वळता करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) औषधांसाठी सुमारे ४ कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेला १० कोटी, कर्करोगाच्या यंत्रसामुग्रीचा २२ कोटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी असलेले २५ कोटी रुपये असे एकूण साधारण ६१ कोटी रुपये हाफकिनकडे वळते केले. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) यंत्र सामुग्रीचे दोन कोटी, औषधे व साहित्याचे दोन कोटी व एमआरआय, सिटीस्कॅनचे २५ कोटी असे एकूण साधारण २९ कोटी रुपये हाफकिन कंपनीकडे वळते केले आहेत. परंतु याला आता वर्ष लोटूनही यंत्रसामुग्रीच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. औषधांबाबतही महामंडळ गंभीर नसल्याने याचा फटका रुग्णालय प्रशासनासोबतच रुग्णांना बसत आहे.मेयो, मेडिकलमध्ये एप्रिलपासून पुरवठा नाहीमेयोने औषध खरेदीसाठी २ कोटी १० लाख तर मेडिकलने ३ कोटी ४६ लाखांचा निधी हाफकिन महामंडळाच्या तिजोरीत जमा केला आहे. परंतु गेल्या दहा महिन्याच्या कालावधीत केवळ ५० ते ६० टक्केच औषधांचा पुरवठा झाला. यातही गेल्या एप्रिल महिन्यांपासून औषधे मिळाली नसल्याचे येथील अधिकारी सांगतात.मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डिसेंबर २०१८ पासून हाफकिन महामंडळाकडून औषधांचा पुरवठाच झालेला नाही. सूत्रानुसार, रुग्णालय प्रशासनाने १६२ औषधांची यादी महामंडळाकडे पाठविली होती. परंतु आतापर्यंत केवळ १०२ औषधी मिळाल्या आहेत. इतर औषधांसाठी रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे.स्थानिक खरेदीचे प्रमाण वाढलेहाफकिन महामंडळाकडून औषधांचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रशासनाला स्थानिक स्तरावर जीवनरक्षक औषधांची खरेदी करावी लागत आहे. गेल्या वर्षभरात याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या तिन्ही रुग्णालयाच्या तिजोरीवर ताण पडला आहे.

टॅग्स :medicinesऔषधंGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)