शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मेयो अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये एसीबीला शरण

By admin | Updated: January 19, 2017 02:30 IST

लाचप्रकरणी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता आरोपी डॉ. मीनाक्षी इंदूप्रकाश गजभिये (वाहणे)

लाच प्रकरण : आज न्यायालयात हजर करणार नागपूर : लाचप्रकरणी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता आरोपी डॉ. मीनाक्षी इंदूप्रकाश गजभिये (वाहणे) या बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात शरण आल्या. त्यांना गुरुवारी विशेष न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज त्यांच्या वकिलांनी मागे घेतला. याच प्रकरणातील अन्य दुसरा आरोपी मेयो कॅन्टीनचा मेसचालक विजय उदितनारायण मिश्रा याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. औषध पुरवठादार टिमकी गोळीबार चौक येथील आशिष मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्सचे मालक आशिष भय्याजी कळंबे यांनी मेयो इस्पितळाला केलेल्या औषध पुरवठ्याच्या २ लाख ९४ हजार ६६० रुपयांच्या देयकाच्या मंजुरीसाठी अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच त्यांनी १६ जानेवारी रोजी विजय मिश्रा याच्यामार्फत स्वीकारली होती. एसीबीच्या पथकाने त्याच वेळी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. सापळ्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत रात्र झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना अटक न करता १७ जानेवारी रोजी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर होण्याबाबत सूचनापत्र देण्यात आले होते. परंतु गजभिये यांनी या कार्यालयात हजर होण्याचे टाळून अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गजभिये यांना अटक करण्यासाठी एसीबीची वेगवेगळी पथके त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात, माहेरी आणि सासरच्या घरी रवाना करण्यात आली होती. परंतु त्या कोठेही आढळून आल्या नव्हत्या. बुधवारीही शोधमोहीम सुरूच असताना त्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास एसीबीच्या कार्यालयात शरण आल्या. त्यांना रीतसर अटक करण्यात आली. मंगळवारी विजय मिश्रा याला अटक करण्यात आली होती. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करून एसीबीने त्याची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. या आरोपीचे वकील अ‍ॅड. दीपक दीक्षित, अ‍ॅड. विलास सेलोकर आणि अ‍ॅड. मिलिंद गाडगे यांनी जामीन अर्ज दाखल केला. त्यावर २० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे उपस्थित होते. तपास अधिकारी उपअधीक्षक दिनकर ठोसरे हे आहेत.(प्रतिनिधी)