शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
4
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
5
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
6
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
7
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
8
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
9
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
10
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
11
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
12
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
13
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
14
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
15
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
16
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
17
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
18
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
19
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
20
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा

मेयो अधिष्ठात्यांच्या वाहनाची तोडफोड

By admin | Updated: February 7, 2015 02:07 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रसूती वॉर्डाच्या इमारतीलागून असलेले अनधिकृत चहाची व परिसरातील इतरही दुकाने ...

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रसूती वॉर्डाच्या इमारतीलागून असलेले अनधिकृत चहाची व परिसरातील इतरही दुकाने अधिष्ठात्यांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षकांनी आज शुक्रवारी हटविले. याच्या विरोधात काही दुकानदारांनी अधिष्ठात्यांच्या वाहनाला लक्ष्य करून प्रचंड तोडफोड केली. यावेळी रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गोपीनाथ बोहत यांचे मेयोच्या प्रसूती वॉर्डाच्या इमारतीला लागून चहाचे दुकान आहे. मागील ३५ वर्षांपासून ते दुकान चालवितात. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बोहत हे अपंग असल्याने मेयो प्रशासन त्यांच्याकडे सहानभूतीने पाहत होते. परंतु तो चहाच्या प्लास्टिक कपाचा कचरा उचलण्याकडे विशेष लक्ष देत नव्हते. त्याने बासबल्लीच्या मदतीने चहाटपरी उभी केली होती. त्याचे पाहून इतरही लोक चहाटपरी लावण्याची मागणी अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांच्याकडे करीत होते. काहींनी तर ठिकठिकाणी चहाच्या टपऱ्या व इतर दुकानेही सुरू केली होती. परिणामी परिसर अस्वच्छ होत होता. अखेर डॉ. वाकोडे यांनी रुग्णालयाच्या परिसरातील सर्वच अनधिकृत दुकाने हटविण्याच्या सूचना सुरक्षारक्षकाला दिल्या. त्या प्रमाणे आज सकाळच्या सुमारास बोहत यांच्यासह सर्वच दुकाने हटविली. याच्याविरोधात बोहत यांनी विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे अध्यक्ष गिरीधर भजभुजे यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार नारेबाजी केली. वाढता असंतोष पाहता कार्यालयाचे दार बंद करण्यात आली. याचवेळी काहींनी अधिष्ठात्यांच्या सुमो वाहनांवर हल्लाबोल करून प्रचंड तोडफोड केली. याची माहिती मिळताच तहसील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीने अपंगांचे शिष्टमंडळ डॉ. वाकोडे यांना भेटले. चहाटपरीसाठी २०० स्केअर फुटाच्या जागेची मागणीचे निवेदन दिले. याावर डॉ. वाकोडे यांनी संबंधित मागणी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गिरीधर भजभुजे यांच्यासह गोपीनाथ बोहत, उमेश गणवीर, शफीक शहा, विजय निखाडे आदी पाच जणांवर कारवाई केली.(प्रतिनिधी)