शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

माता मृत्यूचे प्रमाण वाढलेलेच

By admin | Updated: July 10, 2017 01:54 IST

मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे.

पाच वर्षांत पूर्व विदर्भात ११७० मातांचा मृत्यू : नागपूर, गडचिरोली, चंद्रपुरात सर्वाधिक नोंद

मातृ सुरक्षा दिनसुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मातामृत्यू रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी मातामृत्यूचे सत्र कायम आहे. २०११ ते १६ या पाच वर्षांत पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ११७० मातांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक ६४५ मृत्यू एकट्या नागपूर शहरातील आहे. गडचिरोलीमध्ये १२४, चंद्रपूरमध्ये ११४ तर वर्धेत ९९ मातामृत्यूची नोंद आहे. मातामृत्यू कमी व्हावा यासाठी राज्यात ‘प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान‘ (पीएमएसएमए) ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या मातांचे हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, पोटातील बाळाची वाढ व्यवस्थित झालेली नाही, प्लेटलेटची संख्या कमी आहे आदी माता या अतिजोखमीच्या गटात येतात. या मातांना तातडीने सर्व सुविधा आहेत तेथे प्रसुतीसाठी पाठवले जाते. परिणामी, अनेक गर्भवती महिलांना या योजनेंतर्गत उपचार मिळाले आहेत. यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली झाली आहे. मात्र, रुग्णालयातील हलगर्जीपणा, गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसुतीच्या वेळी मातामृत्यूचे प्रमाण वाढल्याचे या क्षेत्रातीलच तज्ज्ञाचे म्हणणे आहे. प्रसुतीच्यावेळी माता मृत्यूचे कारण वेगवेगळे असू शकतात. माता मृत्यूचे ‘डेथ आॅडिट’ झाल्यास त्या कारणाला समजावून, व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे शक्य आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील.-डॉ. वर्षा ढवळे, स्त्री रोग, प्रसूती तज्ज्ञगेल्या वर्षी २५६ मृत्यूची नोंदनागपूर उपसंचालक आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०११-१२ मध्ये भंडारा जिल्ह्यात १८, गोंदियात १७, चंद्रपुरात ३२, गडचिरोलीत ३१, वर्धेत १५, नागपूर जिल्ह्यात ९, नागपूर शहरात ११७ असे मिळून नागपूर विभागात २३९ माता मृत्यूची नोंद आहे. तर, २०१५-१६मध्ये भंडाऱ्यात ८, गोंदियात ८, चंद्रपुरात १८, गडचिरोलीत २५, वर्धेत २७, नागपूर जिल्ह्यात १२ तर शहरात १५८ मिळून नागपूर सर्कलमध्ये २५६ मातामृत्यूची नोंद आहे. आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे वर्धा व नागपूर जिल्हा सोडल्यास इतर सर्व जिल्ह्यात मृत्यूची संख्या टप्प्याटप्याने कमी झाल्याचेही दिसून येते.