शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

नागपुरात सीएए, एनआरसी विरोधात विशाल रॅली : बहुजन क्रांती मोर्चासह अनेक संघटनांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 21:42 IST

केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व एनपीआर विरोधात बुधवारी नागपुरात विशाल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकत्त्व सुधारणा कायद्याचा कोट्यवधी हिंदूंना बसेल फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व एनपीआर विरोधात बुधवारी नागपुरात विशाल रॅली काढण्यात आली. देशातील घुसखोर आणि बाहेरच्या देशातील मुस्लिमांची भीती दाखवून हे कायदे करण्यात आले आहेत. मात्र या कायद्यांचे दुष्परिणाम मुस्लिमच नाही तर ४० टक्के हिंदूंनाही भोगावे लागतील, असा आरोप करीत हे कायदे ताबडतोब रद्द करण्याची मागणी करून हवे तर डिएनएच्या आधारावर एनआरसी आणण्याची मागणी करण्यात आली. 

बहुजन क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात अनेक संघटना या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मुस्लिम संघटनांसह ओबीसी, बौद्ध, ख्रिश्चन, सिख तसेच महिलांची संख्या लक्षणीय होती. दुपारी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बडकस चौक, गोळीबार चौक, अग्रसेन चौक, मोमीनपुरा, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, एलआयसी होत संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचे सभेचे रुपांतर करण्यात आले. या सभेदरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. रहमत अली, बहुजन क्रांती मोर्चाचे रविकांत मेश्राम, रवी घोडेस्वार यांच्यासह जेयुएच-एचे हाफीज बासित, सिराज अ. कासिम, डब्ल्यूपीआयचे कबीर खान, एआयएमएमएमचे शाहिद रंगुनवाला, एमआयएमचे शहर अध्यक्ष जावेद अख्तर, अल्फा ओमेगाचे पास्टर गायकवाड, ऑल इंडिया फोरमचे मोहम्मद शाहीद, भीम पँथरचे मनोज बन्सोड, तेली समाजाचे विकी बेलखोडे, एनटीडीएनटीचे दीपक ढोके, नवसंघटनाचे पी.के. मेश्राम, भीम आर्मीचे चिमणकर, रिझवानुर्रहमान खान, बुद्धिस्ट संघटनेचे शरद वासे, प्रफुल्ल पाटील, महेश शहारे, बीकेएमचे अध्यक्ष कमलेश सोरते, कुणबी बीकेएमचे गणेश चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 
मुस्लिम समुदायाविरोधात असल्याचे सांगण्यात येत असले तरी बहुसंख्य हिंदूंना या कायद्यामुळे त्रास सहन करावे लागणार असल्याचे वक्त्यांनी सांगितले. अनेक भटक्या जमाती, रोजगारासाठी कायम स्थलांतर करणारे, असंघटीत क्षेत्रात काम करणारे आणि गरीब, अशिक्षित नागरिकांना या कायद्यामुळे होरपळावे लागणार आहे. देशात बेरोजगारी, अनेक कंपन्या बंद होणे, शासकीय संस्थांचे खाजगीकरण, शैक्षणिक अभाव व अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना अशा मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी मुस्लिमांची भीती दाखवून हा कायदा करण्यात आल्याचा आरोप वक्त्यांनी केला.राष्ट्रीय प्रतिकांचा समावेश लक्षवेधीरॅलीमध्ये सर्व समाजाच्या नागरिकांचा समावेश असला तरी अपेक्षेप्रमाणे तरुण व महिलांची संख्या लक्षणीय होती. उल्लेखनीय म्हणजे जातीय प्रतीक चिन्हांपेक्षा राष्ट्रीय प्रतीक चिन्हांचा समावेश लक्षवेधी ठरला. हातात तिरंगा ध्वज उंचावण्यासह मानवी श्रुंखला करून त्यामध्ये काही फुटाचे तिरंगा ध्वज घेउन तरुण रॅलीमध्ये चालत होते. संविधानाच्या प्रतिकासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र झळकवित होते. विविध बॅनरद्वारे केंद्र शासनाचा निषेध नोंदविला जात होता. तरुणांद्वारे ‘इन्कलाब जिंदाबाद’ व ‘हमे चाहिए आझादी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या..

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMorchaमोर्चा