शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात आधारकार्ड केंद्रावर  जोरदार  हाणामारी  !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:04 IST

३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रोष अनावर झाल्याने शनिवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारातील आधारकार्ड केंद्रावर हाणामारीची घटना घडली.

ठळक मुद्देमनपा मुख्यालयातील प्रकार : नागरिकांची तासन्तास प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३१ मार्चपर्यत आवश्यक दस्ताऐवज आधारकार्डशी जोडणे अनिवार्य असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. मात्र यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतरही काम होत नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रोष अनावर झाल्याने शनिवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारातील आधारकार्ड केंद्रावर हाणामारीची घटना घडली. परंतु या संदर्भात पोलिसात तक्रार न दिल्याने अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.सिव्हील लाईन्स येथील महापालिका मुख्यालयाच्या परिसरातील आधारकार्ड केंद्रावर नागरिकांची सकाळपासून गर्दी असते. आजूबाजूच्या परिसरात जागा मिळेल तिथे नागरिक बसून क्रमांक येण्याची प्रतीक्षा करतात. सकाळपासून प्रतीक्षा करीत रांगेत घुसून फोटो काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यासोबत कर्मचाऱ्यांचा वाद झाला. रांगेतील एका नागरिकाने यावर आक्षेप घेतला. यावरून घुसणाऱ्याशी त्याची बाचाबाची झाली. आक्षेप घेणाऱ्या इसमासोबत त्याची पत्नी व दोन मुले होती. त्यांच्या देखतच घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्याने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. परंतु उपस्थित त्याच्या बचावासाठी पुढे आले नाही. ज्याला मारहाण करण्यात आली. तो दारूच्या नशेत असल्याचे कारण पुढे करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. मारहाण झाल्याने संबंधित व्यक्ती आधार कार्डचे काम न करताच कुटुंबासह निघून गेली.आधार लिंक करण्यासाठी महापालिकेतील केंद्रावर दररोज वाद होतात. जिल्हाधिकारी कार्यालय व सुविधा केंद्रावर आधार कार्ड काढण्याची सुविधा होती. तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. मात्र केंद्र सरकारच्या अफलातून निर्णयामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यात सरकारी कार्यालय परिसरातच आधार कार्ड केंद्र असणे बंधनकारक केले आहे. सध्या महापालिका मुख्यालयासह मोजक्याच केंद्रावर ही सुविधा आहे. त्यामुळे सर्वच केंद्रावर नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाAdhar Cardआधार कार्ड