शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दाम्पत्य ठार

By admin | Updated: March 31, 2016 03:17 IST

परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची जोरदार धडक बसली. दरम्यान, मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जखमींना चिरडले.

दुचाकी एकमेकांवर धडकल्या : डोरली परिसरातील घटनाकळमेश्वर : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची जोरदार धडक बसली. दरम्यान, मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जखमींना चिरडले. अशा विचित्र अपघाताच्या घटनेत पती-पत्नी जागीच ठार झाले तर बहीण गंभीर जखमी झाली. ही घटना नागपूर -काटोल मार्गावरील डोरली (भिंगारे) गावालगतच्या आयएमटी कॉलेजजवळ बुधवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.हेमराज सुधाकर ठाकरे (३५, रा. थाटुरवाडा, ता. काटोल) व त्यांची पत्नी कविता हेमराज ठाकरे (३१) अशी मृत दाम्पत्याचे नाव असून संगीता शशिकांत सुके (रा. कळमेश्वर) असे जखमी तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमराज ठाकरे हे पत्नी कवितासह एमएच-४०/झेड-५७७१ क्रमांकाच्या दुचाकीने लहान भावाच्या लग्नानिमित्त नागपूरला खरेदीसाठी निघाले होते. दरम्यान, नागपूरहून परत येताना त्यांनी कळमेश्वर येथील नातेवाईक शशिकांत सुके यांच्या घरी भेट दिली होती.त्यानंतर सायंकाळच्या सुमारास हेमराज यांनी बहीण संगीताला सोबत घेऊन तिघेही थाटूरवाड्याला जात होते. दरम्यान, डोरली परिसरातील आयएमटी कॉलेजवळ काटोलकडून कळमेश्वरकडे येणाऱ्या एमएच-४०/एडब्ल्यू-२३४८ क्रमांकाच्या दुचाकीची समोरासमोर जबर धडक बसली. यात तिघेही खाली पडले. अशातच मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने जखमींना चिरडले. यात हेमराज व त्याची पत्नी कविताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बहीण संगीता सुके ही गंभीररीत्या जखमी झाली.अपघाताची माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी संगीतावर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला नागपूरला हलविण्यात आले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अपघातातील दुसऱ्या दुचाकीचालकाचा शोध लागला नाही. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रमोद मडामे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)