शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

बाजारपेठ हाऊसफुल्ल

By admin | Updated: October 22, 2014 01:00 IST

मंगळवारी सराफा, कपडा, मिठाई, भांडी तसेच फटाका बाजारात दिवसभर खरेदीदारांची गर्दी होती. सर्वच भागात गर्दी झाल्याने अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. बाजारपेठेत

विविध आॅफरचा फायदा : दिवाळीचा उत्साह नागपूर : मंगळवारी सराफा, कपडा, मिठाई, भांडी तसेच फटाका बाजारात दिवसभर खरेदीदारांची गर्दी होती. सर्वच भागात गर्दी झाल्याने अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. बाजारपेठेत अनेक वस्तूंना मोठी मागणी असल्याने रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात दुकाने लावण्यात आली आहेत. दिवाळीचा खरेदी धमाका बघून अनेक व्यापारी, दुकानदार, मॉल आणि कंपन्यांनी खरेदी सूट तसेच अनेक वस्तूंवर एखादी वस्तू मोफत देण्याच्या योजना आणल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या अनेक दुकानदार, व्यापारी, कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. आॅफरचा अनेक ग्राहकांनी फायदा घेतला.आॅटोमोबाईल शोरूममध्ये गर्दीनामांकित आॅटोमोबाईल कंपन्यांच्या विक्रेत्यांकडे बुकिंग केलेल्या गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी होती. सर्व कंपन्यांच्या चारचाकी जवळपास ४०० आणि दुचाकीच्या २ हजारांपेक्षा जास्त गाड्यांची डिलिव्हरी देण्यात आली. अविनाश भुते यांनी सांगितले की, दिवाळीत होंडा आणि यामाहा गाड्यांना मागणी असते. पण यंदा ग्राहकांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह दिसून आला. आधीच नोंदणी केलेल्या सर्व ग्राहकांना गाड्या देण्यात आल्या. याशिवाय मारुतीच्या कार सर्वाधिक विकल्या गेल्या. ग्राहकांनी मनपसंत कारची आधीच नोंद केली होती. एलसीडी, फ्रीज खरेदीत उत्साहइलेक्ट्रॉनिक्स बाजारात सध्या विविध कंपन्यांचे एलईडीचे आकर्षक मॉडेल चर्चेचा विषय आहे. गांधीसागर, इतवारी, यशवंत स्टेडियम या भागातील शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. टीव्हीसोबतच वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हनला सर्वाधिक मागणी होती .भांडीबाजारात उत्साहधनत्रयोदशीला भांडे खरेदी शुभ समजली जाते. पितळी भांड्याची लक्ष्मीची मूर्ती आणि विविध मूर्तींना खूप मागणी होती. शिवाय पूजेचे सामान, तांब्याचे लोटे आणि अन्य भांड्यांची ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. या बाजारात यंदा १५ टक्के जास्त उलाढाल झाली. वाहन पूजनासाठी मंदिरांमध्ये गर्दीधनत्रयोदशीला वाहन पूजनासाठी ग्राहकांची मंदिरांमध्ये गर्दी होती. वर्धा रोड येथील साईमंदिरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. बहुतांश ग्राहकांनी वाहन शोरूममधून पूजेसाठी थेट मंदिरात नेले. अनेकांना रांगेत उभे राहावे लागले. (प्रतिनिधी)