लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : शहरातील आठवडी बाजारातील रस्त्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण पाेलिसांनी हस्तक्षेप करून हटवले हाेते. सहा महिन्यांनंतर परिस्थिती ‘जैसे थे’च झाली असून, यावर नगरपालिका प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे.
अतिक्रमणामुळे बाजारातील रस्त्यांवरून पायी चालणे कठीण झाले हाेते. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रारीही केल्या हाेत्या. पालिका प्रशासन काहीही करीत नसल्याने शेवटी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पाेलीस प्रशासनाने यात हस्तक्षेप केला आणि पाेलीस बंदाेबस्तात बाजारातील रस्त्यांलगतचे अतिक्रमण हटवून सहा महिन्यांपूर्वी रस्ते माेकळे केले हाेते.
या कारवाईदरम्यान पाेलिसांनी भाजीपाला विक्रेत्यांना त्यांना दिलेल्या ओट्यांवर दुकाने थाटण्याची सक्ती केली हाेती. रस्त्यावर भाजीपाल्याची दुकाने थाटणाऱ्यांना दुकानांसाठी जागा उपलब्ध करून दिली हाेती. ये-जा करायला रस्ते माेकळे असायला हवे म्हणून नागरिकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा दिली हाेती. या कारवाईमुळे नागरिकांनी पाेलिसांचे आभार मानले हाेते.
बाजारातील अतिक्रमण हळूहळू वाढत आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, प्रशासन काहीही कारवाई करायला तयार नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पालिका प्रशासन जर कारवाई करीत नसेल तर पाेलीस प्रशासनाने पुन्हा हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
...
अतिक्रमणधारकांना नेत्यांचे पाठबळ
काही स्थानिक नेत्यांनी अतिक्रमणधारकांना अप्रत्यक्ष पाठबळ द्यायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी हळूहळू रस्त्यांवर अतिक्रमण करीत पुन्हा दुकाने थाटायला सुरुवात केली. एकाचे अनुकरण दुसरा दुकानदार करीत असल्याने सध्या बाजारातील रस्त्यालगतचे अतिक्रमण पूर्ववत हाेत असून, रहदारीस व भाजीपाला खरेदीस नागरिकांना अडचणी येत आहेत. हा प्रकार पालिका प्रशासनाला माहिती असूनही प्रशासन केवळ राजकीय नेत्यांमुळे कारवाई करायला तयार नाही.
280721\36313200img-20210728-wa0086.jpg~280721\36313200img-20210728-wa0084.jpg
काटोल बाजर परिसरात थाटलेली अवैध अतिक्रमनामुळे वाहतूक रस्ता आकुंचन पावल्या गेली आहे.~सहा महिन्यांअगोदर बाजार रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले त्यामुळे पार्किंग वव्यवस्था सुरळीत झाली होती तर रस्ता सुद्धा पूर्ण पने मोकळा झाला होता