शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सभागृह की मुक्यांचा बाजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:37 IST

प्रशासन वा पदाधिकाºयांकडून प्रभागातील समस्यांना न्याय न मिळाल्यास कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांना सभागृहात प्रश्न उपस्थित करता येतो.

ठळक मुद्देनगरसेवकांचा सभागृहातील आवाज बंद करणारअधिकारावर निर्बंध घालण्याचा प्रस्तावप्रश्नासाठी लागणार सभापतींची अनुमती- तर मग ही कसली लोकशाही ?

गणेश हुड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासन वा पदाधिकाºयांकडून प्रभागातील समस्यांना न्याय न मिळाल्यास कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांना सभागृहात प्रश्न उपस्थित करता येतो. जनतेच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी नगरसेवकांना प्रश्न उपस्थित करण्याचा मूलभूत अधिकार मिळाला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय देण्याची महापौरांची नैतिक जबाबदारी आहे. परंतु नगरसेवकांच्या प्रश्न उपस्थित करण्याच्या अधिकारावर निर्बंध घालून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रस्ताव आणला जाणार आहे.प्रभागातील ज्वलंत समस्या तातडीने मार्गी लागाव्या यासाठी नगरसेवक गटनेत्यांच्या माध्यमातून सभागृहात प्रश्न उपस्थित करतात. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून गटनेत्याकडून प्रश्न उपस्थित करण्याला संमती दिली जाते. पक्षीय राजकारण न करता नागरिकांना न्याय मिळावा, अशी नगरसेवकांची अपेक्षा असते. परंतु नगरसेवकांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर निर्बंध घालण्यासाठी समिती गठित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नगरसेवकांनी गटनेत्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित न करता संबंधित विषय समित्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करावा. यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला आहे. पुढील सभागृहात याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती पदाधिकाºयांनी दिली.सभागृहात प्रामुख्याने रस्ते, दूषित पाणीपुरवठा, सिवेज लाईन, प्रभागात साचलेला कचरा, आरोग्य सेवा, शाळांची दूरवस्था, रस्त्यांच्या कामातील गैरप्रकार, प्रलंबित विकास कामे, अशा स्वरूपाच्या समस्या प्रश्नांच्या माध्यमातून मांडल्या जातात. वास्तविक तक्रारीनंतर प्रशासनाने दखल घेतली तर नगरसेवकांना सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याची गरजच भासणार नाही. परंतु पदाधिकाºयांचा प्रशासनावर वचक नसल्याने नगरसेवकांची कामे होत नाही. नाईलाजाने त्यांना सभागृहात प्रश्न उपस्थित करावे लागतात. नगरसेवकांच्या तक्रारी न सोडविल्यास संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची हिंमत महापौरांनी दाखविली तर आपोआपच प्रश्नांची संख्या कमी होईल. पण प्रशासनाला जाब न विचारता नगरसेवकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा घाट घातला आहे. या प्रस्तावामुळे मूलभूत अधिकार हिरावले जाणार असल्याने प्रस्तावाला विरोध दर्शविण्यासाठी महापौर व आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.शहरातील सर्वच प्रभागात कमी अधिक प्रमाणात मूलभूत समस्या आहेत. परंतु शिस्त म्हणून सत्तापक्षाच्या नगरसेवकांना प्रश्न उपस्थित करण्यावर मर्यादा आहे. सभागृहात प्रश्न उपस्थित करणाºयांची संख्या मोजकीच आहे.सत्ताधारी नगरसेवकांचाही विरोधविषय समित्यांच्या माध्यमातूनच नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याच्या प्रस्तावाला सत्तापक्षाच्या अनेक नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. सभागृहात प्रश्नच मांडता आले नाही तर प्रभागातील समस्या कशा सुटणार, असा प्रश्न त्यांना पडला आहे. उघडपणे या प्रस्तावाला विरोधही करता येत नसल्याने आम्हाला बघ्याची भूमिका घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.