शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मरावे परी देहरुपी उरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:51 IST

तुमचे अवयवदान ठरू शकते इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण, अवयव दान एक महादान, मरावे परी देहरुपी उरावे...

ठळक मुद्दे भरपावसात महाअवयवदान रॅली : तीन हजारावर डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुमचे अवयवदान ठरू शकते इतरांच्या आयुष्यातील आशेचा किरण, अवयव दान एक महादान, मरावे परी देहरुपी उरावे... अशी विविध घोषवाक्य देत भरपावसात निघालेल्या ‘महाअवयव दान’ रॅलीने मंगळवारी सकाळी शहरवासीयांचे लक्ष वेधले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित अवयवदान जनजागृती महोत्सवानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये तीन हजारावर डॉक्टर, परिचारिका, विद्यार्थी व कर्मचाºयांचा समावेश होता.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) पुढाकाराने आयोजित या रॅलीला महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे उपस्थित होते. मेडिकलच्या क्रीडांगण येथून निघालेली ही रॅली राष्टÑसंत तुकडोजी महाराज चौक, क्रीडा चौक, मेडिकल चौक मार्गक्रमण करीत मेडिकलच्या क्रीडांगणावर पोहचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. पाऊस सुरू असतानाही शिस्तबद्ध पद्धतीने रॅली निघाली. विशेषत: रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबतच बहुसंख्य वरिष्ठ डॉक्टरांची उपस्थिती होती. या रॅलीमध्ये मेडिकल महाविद्यालयासोबतच, शासकीय दंत महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो), धनवटे नॅशनल महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, शिवाजी विज्ञान महाविद्यालय व मेडिकलच्या एनसीसी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीमध्ये उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. राज गजभिये, डॉ. रमेश पराते, डॉ. अशोक मदान, डॉ. नरेंद्र तिरपुडे, डॉ. उदय नार्लावार, डॉ. सी.एम. बोकडे, डॉ. समीर गोलावार, डॉ. गणेश डाखळे, डॉ. श्रीखंडे आदी उपस्थित होते. रॅलीच्या आयोजनासोबतच इतर विविध स्पर्धा व माहितीपर कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी डॉ. उदय नार्लावार यांच्या मार्गदर्शनात महाअवयवदान कोआॅर्डिनेटर डॉ. अविनाश गावंडे, डॉ. बागडे, डॉ. वाधवा, डॉ. पाटील, डॉ. लांजेवार, डॉ. मेश्राम, डॉ. जोगुलवार यांच्यासह पीएसएम विभागाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.