शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषिक उमेदवारांना फटका

By admin | Updated: June 20, 2017 01:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करणाऱ्या उमेदवारांना संशोधन कार्यपद्धतीचे ‘कोर्सवर्क’ करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

नागपूर विद्यापीठ : ‘पीएचडी कोर्सवर्क’ची परीक्षा इंग्रजीतच, मराठीत संशोधन करणाऱ्यांची अडचणलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ करणाऱ्या उमेदवारांना संशोधन कार्यपद्धतीचे ‘कोर्सवर्क’ करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ‘कोर्सवर्क’च्या अभ्यासक्रमावर आधारित ‘आॅनलाईन’ परीक्षादेखील घेण्यात येते. मात्र ही परीक्षा इंग्रजीतच असल्यामुळे मराठीत संशोधन करणाऱ्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कुलगुरूंनी तत्काळ कार्यवाही करून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ची बजबजपुरी माजली आहे. संशोधनाचा स्तर वाढावा यासाठी ‘युजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) अगोदरच पावले उचलली होती. नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे ‘पीएचडी’च्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्यकता वाटत होती. त्यामुळे यासंदर्भात नागपूर विद्यापीठानेदेखील मागील वर्षी नवीन नियमावली जारी केली होती. यानुसारच ‘पीएचडी’साठी नियमांनुसार संशोधन पद्धतीवर ‘कोर्सवर्क’ आवश्यक करण्यात आले. या ‘कोर्सवर्क’चा ६० तासांचा अभ्यासक्रम विद्यापीठाकडून तयारदेखील करण्यात आला आहे. याची उमेदवारांना ‘आॅनलाईन’ परीक्षादेखील द्यावी लागले. मात्र संबंधित अभ्यासक्रम हा इंग्रजीतच उपलब्ध आहे. अगदी इंग्रजी विषयदेखील यात समाविष्ट आहे. मात्र अनेक उमेदवारांच्या संशोधन लेखन व प्रबंधाची भाषा मराठी असते. अनेकांना तर इंग्रजीची आवश्यकतादेखील भासत नाही. मात्र अभ्यासक्रमात समाविष्ट असल्यामुळे त्यांना विनाकारण इंग्रजीत अभ्यास करावा लागत आहे. यामुळे अनेक मुद्दे समजतच नसल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे आता ‘कोर्सवर्क’च्या परीक्षेत नकारात्मक गुण देण्यात येणार आहेत. अशा स्थितीत इंग्रजीतील प्रश्नच समजला नाही तर काय करायचे, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. विद्यापीठाने मराठी भाषिक व मराठीतून संशोधन करणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा. तसेच परीक्षा मराठी माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात ‘अ‍ॅकेडॅमिक स्टाफ कॉलेज’च्या संचालकांना पत्रदेखील पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता अशी तक्रार माझ्यापर्यंत आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसारच ‘कोर्सवर्क’चा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे व परीक्षादेखील त्याचपद्धतीने होत आहे. मराठीत शिकविण्यात आले तर इतर भाषेत संशोधन करणाऱ्यांवर अन्याय होईल. प्रश्नपत्रिका मराठीत उपलब्ध करून देण्याबाबत विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.