शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

अ.भा. मराठी साहित्य संमेलन; रविवारी जाहीर होणार नवीन संमेलनाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 10:28 IST

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गुजरात राज्यातील बडोदा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून रविवारी १० डिसेंबर रोजी निर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल.

ठळक मुद्देमतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

आॅनलाईन लोकमतनागपूर : ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गुजरात राज्यातील बडोदा येथे होत आहे. यंदाच्या पंचरंगी लढतीत कोण बाजी मारतो याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून शनिवारी ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ पर्यंत सर्व मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचलेल्या असतील. रविवारी १० डिसेंबर रोजी निर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर केले जाईल. डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजन खान हे पाच उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात आहेत. अखिल भारतीय मराठी जणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षाची निवड जेमतेम १ हजार ७० मतदार करीत असतात. त्यापैकी फक्त ४०५ मतपत्रिका ४ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत पोचल्या होत्या, अशी माहिती आहे. शेवटच्या दोन दिवसात मतपत्रिका येण्याचा वेग वाढेल, अशी अपेक्षा आहे. मतदारांना मतपत्रिका पाठवताना काहींचे पत्ते चुकले. त्यांना पुन्हा डुप्लिकेट मतपत्रिका पाठवण्यासोबतच ज्यांचे राहण्याचे ठिकाण बदलले आहे, त्यांच्या विनंतीवरून त्यांनाही पुन्हा डुप्लिकेट मतपत्रिका पाठवल्याचे कळते. अखेर ही दीर्घ प्रक्रिया पूर्ण होत आली असून निकाल जाहीर व्हायला आता केवळ चार दिवस उरले आहेत. सुरुवातील पंचरंगी वाटणारी ही निवडणूक आता जवळजवळ दुहेरी लढतीवर येऊन थांबली आहे. मतदानाच्या विभाजनाची टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडते त्यावरून नवीन संमेलनाध्यक्ष ठरणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत बृहन्महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत विशेष उत्साह आहे. ते आपला कौल कुणाला देतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. उमेदवारांचे प्रचार कार्य थांबले असून ते निकालाची उत्कटतेने प्रतीक्षा करीत आहेत. रविवारी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात जाहीर होणारे नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षाचे नाव विदर्भातले असेल की पश्चिम महाराष्ट्रातले याकडेही त्यांचे लक्ष लागले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारासाठी विदर्भातून फोनकुणी कितीही नाकारले तरी या निवडणुकीमध्ये प्रादेशिकवादाचा ‘फॅक्टर’ महत्त्वाचा ठरतोच. संमेलनाध्यक्ष आपला प्रांतातला असावा, असा सर्वांचाच प्रयत्न असतो. परंतु यंदा विदर्भातील चित्र वेगळे होते. विदर्भातीलच काही साहित्यिकांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी तिकडच्या आपल्या मित्रांना फोन केल्याची चर्चा असून अशा ‘फोनाफोनी’ने विदर्भातील उमेदवारांचे किती नुकसान केले हेही निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :marathiमराठी