शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

मनपाच्या बजेटला कर्जाचा आधार!

By admin | Updated: June 2, 2014 02:15 IST

स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) नागपूर महानगरपालिकेला चांगलाच फटका बसला आहे.

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) नागपूर महानगरपालिकेला चांगलाच फटका बसला आहे. मनपाच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला आहे. परिणामत: स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांना यंदा मनपाचे बजेट तयार करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. माहिती सूत्रानुसार कर्जाच्या बळावर बजेट फुगविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संपूर्ण बजेट तयार झाले असून, त्यात जनतेला आकर्षित करणार्‍या अनेक घोषणांचा समावेश असल्याची माहिती आहे.

माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी यापूर्वी १,४0१ कोटींचे बजेट सादर केले होते. परंतु मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी त्याला कात्री लावून ते १0४७ .८0 कोटींपर्यंंत कमी केले होते. तसेच २0१४-१५ चे प्रस्तावित बजेट १0६५.५१ कोटी रुपयांचे सादर करण्यात आले आहे. अशा स्थितीत बाल्या बोरकर यांनी आपले बजेट ठाकरे यांच्या बजेटपेक्षा वाढविले, तर त्यांना किमान ५00 कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा मनपाला मार्च अखेरपर्यंंत ८0१ कोटींचे उत्पन्न झाले आहे. यामुळे आयुक्तांना प्रस्तावित बजेट सादर करण्यासाठी सुमारे २६0 कोटींची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

शिवाय जेएनयूआरएम योजनेतील अनेक कामे रखडली आहेत. त्यासाठी मनपाला वेगळी तरतूद करावी लागणार आहे. यंदाच्या मनपा बजेटमध्ये नवीन क्र ीडा संकुल व रुग्णालयांसह सामान्य जनतेला आकर्षित करणार्‍या घोषणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. अलीकडेच केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे केंद्राकडूनही मनपाला भरीव मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)