शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

५०० चौ.मीटर क्षेत्रापर्यंतचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे  : अभय गोटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:43 PM

५०० चौ.मीटर क्षेत्रापर्यंत बांधकामाचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे, अशी सूचना स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले.

ठळक मुद्देनागपूर महानगरपालिकेच्या स्थापत्य व प्रकल्प समितीची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ले-आऊटवरील बांधकामासाठी नकाशे मंजूर करण्याकरिता महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची परवानगी आवश्यक असते. त्यासाठीची विकेंद्रीकरण पद्धती सुरू करण्यासाठी ५०० चौ.मीटर क्षेत्रापर्यंत बांधकामाचे नकाशे झोनस्तरावर मंजूर करण्यात यावे, अशी सूचना स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अभय गोटेकर यांनी दिले.शुक्रवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू ) झलके, समिती सदस्य विद्या मडावी, सोनाली कडू, पल्लवी श्यामकुळे, अंसारी सय्यदा बेगम मोहम्मद निजामुद्दीन, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता अमीन अख्तर, राजेश भूतकर, गिरिश वासनिक, नगररचना विभागाचे उपअभियंता उज्ज्वल धनविजय, नगररचना विभागाचे श्रीकांत देशपांडे, आर.एस.निमजे बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते.शहरातील ५७२ अंतर्गत येणाऱ्या ले-आऊटवरील नकाशा बांधकाम नकाशे मंजूर होत नसल्याची तक्रार वारंवार होत होती. याबाबत संबंधित विभागाला विचारणा केली असता २७ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार शहराच्या नियोजन व व्यवस्थापनाची पूर्ण जबाबदारी ही महापालिकेची असल्याचे नगररचना विभागाचे श्रीकांत देशपाडे यांनी सांगितले. प्रलंबित नकाशे मंजुरीची कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश सभापती अभय गोटेकर यांनी दिले. मनुष्यबळ अपुरे पडत असतील तर त्याबाबत नासुप्रला पत्र देण्यात यावे, असेही अभय गोटेकर यांनी सूचवले.रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. रेन वॉटर हार्वेस्टिंग आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिगचे प्रमाणपत्र आर्किटेक्ट कडून घेणे आवश्यक आहे. याबाबत सकारात्मतेने काम करण्याचे निर्देश सभापती अभय गोटेकर यांनी दिले.मनपा मार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा यावेळी सभापती अभय गोटेकर यांनी घेतला. यामध्ये ऑरेंज स्ट्रीट प्रकल्प, बुधवार बाजार महाल, कमाल टॉकीज जवळील प्रकल्प, महाल गांधीबाग झोन ऑफिस, टाऊन हॉल, मासोळी बाजार, आयसोलेशन हॉस्पीटलचा समावेश आहे. शहरात सुरू असेलेल्या सीमेंट रस्ता टप्पा १,२,३ चा आढावा यावेळी सभापती अभय गोटेकर यांनी घेतला. शहरातील मनपा मालकीच्या खुल्या जागा किती आहे याचा आढावा सभापतींनी यावेळी घेतला. खुल्या जागेवर फलक लावावे, असे निर्देश अभय गोटेकर यांनी दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका