शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

माओवादी साईबाबाला विविध गंभीर आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 20:41 IST

बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याची तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच वैद्यकीय तपासणी करून अहवाल दिला. त्यावरून साईबाबाला विविध गंभीर आजार असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे साईबाबाला वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर करण्यात यावा असा विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजामीन देण्याची हायकोर्टाला विनंती : कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी केली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याची तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. गोपीनाथ यांनी नुकतीच वैद्यकीय तपासणी करून अहवाल दिला. त्यावरून साईबाबाला विविध गंभीर आजार असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे साईबाबाला वैद्यकीय कारणावरून जामीन मंजूर करण्यात यावा असा विनंती अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले. न्यायालयाने गोपीनाथ यांच्यासह काजीपेटस्थित प्रसाद हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. एन. प्रसाद व नवी दिल्ली येथील एम्सच्या जेरिअ‍ॅट्रिक मेडिसिन विभागाचे वरिष्ठ निवासी डॉक्टर हाजित भट्टी यांना साईबाबाची वैद्यकीय तपासणी करण्याची सशर्त परवानगी दिली होती. दरम्यान, राज्याच्या दक्षता विभागाने या तिन्ही डॉक्टर्सचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा अहवाल सरकारला सादर केला. त्यामुळे सरकारने या डॉक्टर्सकडून साईबाबाची तपासणी करून घेण्याचा आदेश मागे घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. परंतु, न्यायालयाने संबंधित आदेश मागे न घेता साईबाबाच्या तपासणीकरिता अधिक कठोर अटी लागू केल्या होत्या. त्यानंतर प्रसाद व भट्टी हे दोघेजण साईबाबाची तपासणी करण्याकरिता आले नाही. केवळ गोपीनाथ यांनीच साईबाबाची तपासणी करून अहवाल दिला. २६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये साईबाबाची तपासणी करण्यात आली. न्यायालयात साईबाबातर्फे अ‍ॅड. आकाश सोरडे व अ‍ॅड. बरुणकुमार यांनी तर, सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.साईबाबा ९० टक्के दिव्यांगसाईबाबा ९० टक्के दिव्यांग आहे. त्यासोबतच त्याला विविध गंभीर आजार झाले आहेत. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnaxaliteनक्षलवादी