शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेत ‘इनकमिंग’साठी अनेकांच्या रांगा; जयस्वाल-तुमाने यांचा दावा

By आनंद डेकाटे | Updated: February 17, 2025 18:48 IST

Nagpur : कन्हानमध्ये २० तारखेला एकनाथ शिंदे यांची आभार सभा

आनंद डेकाटे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 'ऑपरेशन टायगर' चा विदर्भात विस्तार होण्याची शक्यता आहे. पक्षात 'इनकमिंग'साठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. अनेक लोक संपर्कात आहेत, असा दावा राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार कृपाल तुमाने यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. येत्या २० फेब्रुवारी रोजी कन्हान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत काही नेते पक्षात सामील होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात शिवसेनेचा (शिंदे) निवडणुकीत चांगलाच स्ट्राईक रेट होता. खरी शिवसेना कोणती हे जनतेने निवडणुकीतून दाखवून दिले. विधानसभेत पक्षाचे आता ६० आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्व ६० विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या कृतज्ञता (आभार) सभा आयोजित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विदर्भातील अशा प्रकारची पहिली सभा रामटेक विधानसभा मतदारसंघातील कन्हान येथे २० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्हान पोलीस ठाण्याजवळील मैदानात होणार आहे. या सभेला काही मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. इतर पक्षांचे अनेक नेते या काळात पक्षात प्रवेश करू शकतात. मात्र, कोणाला प्रवेश द्यायचा हे पक्षाचे नेतेच ठरवतील, असे सांगत जयस्वाल यांनी नाव सांगण्यास नकार दिला. स्थानिक अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतला जाईल. पण काहीही होऊ शकते. यावेळी पक्षाचे संपर्कप्रमुख मंगेश काशीकर, संदीप इटकेलवार आदी उपस्थित होते.

शरद पवारांवर शंकाराज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, महाविकास आघाडीत आता कमालीची नाराजी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेवर साशंकता आहे. अशा स्थितीत महायुती आणि शिंदेसेनेकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाआघाडीच्या रुपात लढवण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले. पक्षाने डिजिटल सदस्यत्व अभियान सुरू केले आहे. एकनाथ शिंदे यांना लाडका भाऊ आणि लोकांमध्ये राहणारा नेता असे संबोधून त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आपली कोणतीही नाराजी नसल्याचा दावाही केला.

टॅग्स :Ashish Jaiswalआशीष जैस्वालKrupal Tumaneकृपाल तुमानेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे