शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांमुळे अनेकांना अंधत्व

By admin | Updated: October 28, 2016 02:53 IST

दिवाळीतील आनंदाचे, उत्साहाचे प्रतीक म्हणजे फटाके. परंतु या फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते.

सुतळीबॉम्ब, चक्र, रॉकेट ठरते घातक : दरवर्षी पाच हजार लोकांना फटकानागपूर : दिवाळीतील आनंदाचे, उत्साहाचे प्रतीक म्हणजे फटाके. परंतु या फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्यांमध्ये अनार ६० टक्के, सुतळीबॉम्ब ३० टक्के, चक्री आणि रॉकेट १० टक्के व इतर फटाक्यांचे १० टक्के प्रमाण आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले की, फटाक्यांमुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाख आहे. याला कारणीभूत फटाक्यातील चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक आहेत. या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना तसेच त्वचेला अपायकारक असतो. त्यामुळे दमा व अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढते. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डिग्रीपर्यंत वाढते. फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. यातील ६० टक्के व्यक्ती या २० वर्षांखालील असतात. यात पुरुषांची संख्या ८० टक्के असते. फटाके फोडणाऱ्यांपेक्षा बघणाऱ्यांना याची जास्त बाधा होते. कारण स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्याची जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा काढावा लागू शकतो. बारुदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते.(प्रतिनिधी) इजा झाल्यास डोळे चोळू नयेडोळ्याला इजा झाल्यास डोळे चोळू नये. डोळे चोळल्यास त्यात फसलेले कण आत खोलवर जाऊ शकतात. त्यामुळे डोळा आणखी खराब होण्याची शक्यता असते. डोळे पाण्याने धुऊ नये. कारण, तसे केल्यास खराब पाण्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची भीती असते. डोळ्यांमध्ये मलम टाकू नये. शक्य तितक्या लवकर जवळच्या नेत्ररोगतज्ज्ञांना दाखवून उपचार करावा, असा सल्ला डॉ. मदान यांनी दिला.