शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरसह अनेकांचे कनेक्शन

By admin | Updated: June 28, 2015 03:06 IST

मानकापुरातील बिल्डिंग मटेरियल कॉन्ट्रॅक्टर मोहित मार्टिन पीटर (वय २३) याच्या हत्याकांडात शहरातील एका बिल्डरसह अनेकांचे कनेक्शन उजेडात आले आहे.

मोहित पीटर हत्याकांड : आरोपींना २ जुलैपर्यंत पीसीआर नागपूर : मानकापुरातील बिल्डिंग मटेरियल कॉन्ट्रॅक्टर मोहित मार्टिन पीटर (वय २३) याच्या हत्याकांडात शहरातील एका बिल्डरसह अनेकांचे कनेक्शन उजेडात आले आहे. परिणामी पुढच्या एक-दोन दिवसात धक्कादायक घडामोडीची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मॅडी ऊर्फ आशिष राठोड, तंबी ऊर्फ जेम्स बबलू गॅब्रियल, ब्रायन बेस्टियन ऊर्फ इब्राहिम अण्णा पलटी ऊर्फ सचिन गॅब्रियल आणि पापा ऊर्फ राजेंद्र जयराम साळवे या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकीही जप्त केली. आरोपींना कोर्टात हजर करून त्यांचा २ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला आहे. आरोपींच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक पैलू उघड झाले. त्यानुसार, आरोपींनी मोहितचा गेम गुरुवारी रात्रीच करण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी मार्टिननगरात मोहितची शोधाशोधही केली. परंतू, तो हाती लागला नसल्याने दुसऱ्या दिवशीची तयारी करीत आरोपी आपापल्या ठिकाणांवर गेले. सकाळी उठल्याउठल्याच त्यांनी मोहितच्या घातपाताचा कट रचणाऱ्याकडून काही रक्कम घेतली अन् पुन्हा जमवाजमव केली. सारे आरोपी एकत्र आल्यानंतर त्यांना वाहने आणि शस्त्रे पुरविण्यात आली. त्यानंतर मोहितचा गेम करण्यासाठी मानकापूर चौकाजवळच्या जगदंबा हाईटस् या इमारतीतील व्यापारी गाळ्यात शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास उपरोक्त आरोपी साथीदारांसह पोहचले. मोहितच्या केबिनमध्ये जाताच तंबीच्या हातातील तिखट पावडरचे पॅकेट हिसकावून घेत पापाने मोहितच्या तोंडावर तिखट फेकले. त्यानंतर सारेच त्याच्यावर तुटून पडले. कोयता, तलवारीचे ३५ ते ४० घाव करून मारेकऱ्यांनी मोहितला जागीच संपवले. दुसरीकडे येऊन मोहितच्या बचावासाठी धावलेल्या मिखिल मायकल फ्रान्सिस (वय १८) याच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी त्याला मागे ओढून जबर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी या दोघांच्या गळ्यातील दोन लाखांच्या सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. सक्करदऱ्यात जाळले कपडेमोहितची हत्या केल्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या भागात धाव घेतली. तंबी, इब्राहिम आणि पापा हे तिघे सक्करदऱ्यातील एका रूममध्ये गेले. रस्त्यातूनच त्यांनी दारू विकत घेतली. रूममध्ये दारू ढोसल्यानंतर या तिघांनी रक्ताने माखलेले कपडे बदलवून जाळून टाकले. आपल्या साथीदारांना आणि ‘सूत्रधारा’ला फोन करून आरोपी सायंकाळी बाहेर पडले. दुकानातून दारू विकत घेतल्यानंतर आपल्या साथीदारांची वाट बघत ते सक्करदरा तलावाजवळ दारू पीत बसले. तेवढ्यात तेथे धावपळ करत पोलीस पोहचले आणि त्यांच्या मुसक्या बांधल्या. दुसरीकडे गुन्हे शाखेच्या पथकाने मॅडी आणि अण्णा पलटीला जरीपटक्यात जेरबंद केले. (प्रतिनिधी) लोकमतच्या वृत्ताला बळकटीअटक करण्यात आलेल्या मॅडीचे कनेक्शन गुन्हेगारी वर्तुळात साऱ्यांच्याच परिचयाचे आहे. तो उत्तर नागपुरातील भूमाफिया आणि एका वादग्रस्त बिल्डरांसोबत काही गुन्हेगारांच्या गळ्यातील ताईत आहे. जमीन बळकावणे, कब्जे मारणे आणि भूमाफिया-बिल्डरांच्या मध्यस्थीने मांडवलीच्या माध्यमातून लाखो रुपये उकळण्याची त्याची पद्धत कुपरिचित आहे. मोहितची हत्या त्याने भूमाफिया आणि बिल्डरांच्या इशाऱ्यावरूनच करवून घेतल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, आरोपींच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (सीडीआर) हाती आल्यानंतर खुद्द पोलिसही चक्रावले आहेत. उपराजधानीतील ‘तो’ बिल्डर, भूमाफिया आणि काही गुन्हेगार आरोपींशी निरंतर संपर्कात असल्याचे त्यातून उघड झाले आहे. सोबतच हत्येची सुपारी देणारे आणि मॅडीच्या माध्यमातून मोहितचा गेम करणारे हेच असावेत, या संशयाला आता बळकटी मिळाली आहे. सोबतच लोकमतने शुक्रवारच्या अंकात प्रकाशित केलेल्या ‘सुपारी किलिंग’च्या वृत्तालाही यामुळे दुजोरा मिळाला आहे.बिल्डरला होणार विचारपूस या हत्याकांडाच्या तपासावर पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन सिन्हा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि उपायुक्त दीपाली मासिरकर यांची थेट नजर आहे. हत्याकांडात वादग्रस्त बिल्डर, भूमाफियाचे नाव पुढे आल्यामुळे तपास प्रभावित होणार नाही, त्याकडे खास लक्ष दिले जात असून, गुन्हे शाखेच्या मदतीने गिट्टीखदानचे ठाणेदार अवधेश त्रिपाठी, डीबीचे एपीआय जितेंद्र बोबडे, पीएसआय कैलास भगत, सूर्यकांत पातोडे, अनिल ढिमोले, अरुण चांदणे, राम गणेश तसेच अजय त्रिपाठी तपास करीत आहेत. आरोपींकडून लपवाछपवी केली जात असली तरी लवकरच बिल्डरलाही चौकशीसाठी बोलवून चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी एका प्राणघातक हल्ल्याच्या घटनेत नाव आल्यापासून हा बिल्डर वादग्रस्त झालेला आहे.