लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण २७० सुरक्षा रक्षक मनपात सेवा देत आहेत. या सुरक्षा रक्षकांचे वेतन खासगी सुरक्षा रक्षकांच्या तुलनेत अधिक असल्याने मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सेवा घेण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.
सध्या सुरक्षा महामंडळाचे १०७ सुरक्षा रक्षक व ३ पर्यवेक्षक सेवेत आहेत. १५ मार्चपासून स्थायी समितीकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता. मनपात राज्य सुरक्षा महामंडळ व खासगी एजन्सीचे सुरक्षा रक्षक सेवा देत आहेत. परंतु महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांचे वेतन अधिक आहे. पुन्हा ५० सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केल्यास मनपावर आर्थिक बोजा पडणार आहे. यामुळे हा प्रस्ताव नामंजूर करून निविदा काढून सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंगळवारी येथील मच्छीबाजारातील १०८ पैकी १०४ ओटे ३० जून २०१५ रोजी मच्छी विक्रेत्यांना वाटप करण्यात आले होते. याबाबतचा करारनामा करण्यात आला. परंतु या ओट्यांचा वापर केला जात नाही. त्यामुळे हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मलेरिया-फायलेरिया विभागासाठी दोन वर्षाकरिता कीटकनाशक, औषधी खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
...
हॉटमिक्सकडे सामुग्री नाही
मनपाच्या हॉटमिक्स विभागाकडे रस्ते बांधकामासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीची कमी आहे. याचा विचार करता या विभागासाठी २.१९ कोटीची सामुग्री निविदा काढून खरेदी करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली.