शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुरावरून मनपा-नासुप्र जुंपली

By admin | Updated: June 24, 2015 03:05 IST

सोमवारी मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

एकमेकांवर खापर : अनधिकृत ले-आऊ टमध्ये पाणी तुंबले नागपूर : सोमवारी मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. २४ तासानंतरही दक्षिण व उत्तर-पूर्व नागपुरातील काही भागात पाणी तुंबले आहे. शहरालगतच्या भागात पावसाचे पाणी वाहून जाणारी यंत्रणा नसल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील काही प्रमुख वस्त्यातही पाणी शिरले होते. याला मनपा प्रशासन जबाबदार असल्याचे नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे अनधिकृत ले-आऊ टमध्ये नियोजनबद्ध विकास न झाल्याने याला नासुप्र जबाबदार असल्याचा दावा मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पुराच्या मुद्यावरून मनपा व नासुप्र यांच्यात चांगलीच जुंपली आहे.नदी, नाल्याच्या काठावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे बेसा, बेलतरोडी, पिपळा फाटा, हुडकेश्वर आदी भागातील परिस्थिती गंभीर बनली आहे. उत्तर नागपुरातील नारी-नारा, यशोधरानगर, राणी दुर्गावतीनगर, इंदोरा, वनदेवीनगर, पूर्व नागपुरातील विजयनगर, भरतवाडा, पावनगाव, गुलमोहरनगर, पुनापूर व पारडी आदी भागात पाणी तुंबले होते. विजयनगर भागात गडरलाईन नसल्याची माहिती स्थानिक रहिवासी विजय शाहू यांनी दिली. नारी भागात अनधिकृत बांधकामामुळे पाणी तुंबण्याच्या घटना वाढत आहेत. बेसा-बेलतरोडी भागात उंच इमारती उभारण्यात आल्या आहेत. परंतु पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा नाही. रस्ते व पावसाळी नाल्या नसल्याचे विजय देशपांडे म्हणाले.(प्रतिनिधी)