शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंदाताई आमटेंच्या धाडीने दिले दारूबंदी आंदोलनाला बळ

By admin | Updated: September 2, 2014 01:09 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकल्या जात आहे. या दारूने अनेक जीव घेतले आहेत. तरीही राज्याचा उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अवैध दारू विक्री

भामरागडात जप्त केली दारू : चंद्रपूर जिल्हा दारूबंदी आंदोलन तापण्याची शक्यतागडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे दारू विकल्या जात आहे. या दारूने अनेक जीव घेतले आहेत. तरीही राज्याचा उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासन अवैध दारू विक्री रोखण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे गावागावातील महिलांनाच आता दारूबंदीसाठी पुढाकार घ्यावा लागत आहे.दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंदाकिनी आमटे यांनी शेकडो महिलांसह भामरागडसारख्या दुर्गम गावात दारूविक्रेत्यांवर धाड घालून अवैध दारुसाठा पकडण्यास पोलिसांना भाग पाडले. मंदातार्इंचे हे आंदोलन गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीसाठी सक्रिय काम करणाऱ्या अनेक महिला व पुरूषांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शासनाने महाराष्ट्रात वर्धा व गडचिरोली या दोन जिल्ह्यात दारूबंदी केलीे. मात्र दोन्ही ठिकाणी राजरोस विक्री सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीत चारही बाजूंना ३० ते ३५ दारू दुकानांचा वेढा पडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूचे मोठे व्यापारी येथे राजरोसपणे माल पुरवीत आहेत. चंद्रपूर जिल्हा संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी जोर धरत असताना कोकणातील काही दुकानांनाही गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दुकाने थाटण्यासाठी परवाने देण्यात येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनावर नक्षल मोहिमेचा भार असल्याने दारूबंदी विरोधात काम करताना त्यांना अडचणी येतात. मात्र उत्पादन शुल्क विभागाला कोणतीही अडचण नाही. जिल्ह्यात विषारी दारूही मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. पोळ्याच्या दिवशी आरमोरी तालुक्याच्या वनखी गावात एका तरूणाचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. भामरागड गावात मागील काही वर्षात अवैध दारू विकण्यावर बंधने आली होती. मात्र अलीकडे खुलेआम विक्री वाढल्याने महिलांचा त्रासही वाढला आहे.ही बाब लक्षात घेऊन डॉ. मंदाकिनी आमटे व त्यांच्या कुटुंबातील महिलांसह शेकडो महिलांनी गावातील दारूविक्रेत्यांवर धाड मारुन साडेचार लाखाची दारू जप्त केली व पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. मंदातार्इंच्या दारूबंदीविषयक भूमिकेमुळे आंदोलनातील महिलांना बळ मिळाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनालाही आता बळकटी मिळणार आहे. राज्य सरकारने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तिनही जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी यापूर्वीच ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)