शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा दावा फोल-फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:23 IST

पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिनाभरात उपराजधानीतील डांबरी रस्ते उखडून त्यावर खड्डे पडलेले आहेत.

ठळक मुद्देसभागृहातील घोषणा कागदावरच : गणेशोत्सवातही दुरुस्तीची बुद्धी सुचली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिनाभरात उपराजधानीतील डांबरी रस्ते उखडून त्यावर खड्डे पडलेले आहेत. लोकांच्या तक्रारी आल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. एवढेच नव्हे तर रोज खड्डे बुजविल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यानंतरही शहरातील रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने हा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाचीच पोलखोल झाली आहे.दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील रस्ते उखडतात. खड्ड्यांमुळे अपघात होतात. वाहनचालकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम केल्यानंतर दोन वर्षांचा दायित्व कालावधी असतो. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत महापालिकेने जवळपास ४०० रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. शहरातील रस्ते महापालिका, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आदींच्या मालकीचे आहेत.परंतु २२७१ किलोमीटरपैकी २१७२ किलोमीटर लांबीचे रस्ते महापालिकेच्या मालकीचे असल्याने, शहरातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रामुख्याने महापालिकेचीच आहे.रस्त्यांवर फलक लागलेच नाहीउखडलेल्या रस्त्यामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर फलक लावण्याची घोषणा वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार यात रस्ता कोणाच्या मालकीचा आहे, रस्त्याचे काम कोणत्या कंत्राटदाराने केले़, त्याला केव्हा काम दिले, दायित्व कालावधी केव्हापर्यंत आहे, कामाची किंमत, कामावर देखरेख ठेवणाºया महापालिकेतील अधिकाºयाचे नाव आदी बाबींचा यात समावेश राहणार होता. परंतु प्रत्यक्षात असे फलक लागलेच नाही.बुजविल्यानंतर पुन्हा खड्डेशहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. एप्रिल २०१४ जून २०१७ या कालावधीत खड्डे बुजविण्यासाठी ५३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात २१ कोटी ६० लाखांचाच खर्च करण्यात आला. जेट पॅचरच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यावर १४ कोटी ४५ लाखांचा खर्च करण्यात आला तर हॉटमिक्स प्लान्टवर ७ कोटी १५ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु खड्डे बुजविलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडलेले आहेत.