शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

माणूस एक अन् धर्म दोन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:03 IST

अशातच ‘माणूस एक अन् धर्म दोन’ अशी न्यारी किमया उमरेड (जि. नागपूर) नगर पालिकेत उजेडात आली आहे.

ठळक मुद्दे कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तिकेत नोंद

अभय लांजेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सध्या देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीच्या मुद्यावर वादंग सुरू आहे. मी हिंदू, तू मुसलमान, तो अमुक आणि तो तमुक यावर रान पेटले आहे. अशातच ‘माणूस एक अन् धर्म दोन’ अशी न्यारी किमया उमरेड (जि. नागपूर) नगर पालिकेत उजेडात आली आहे. चक्क कर्मचाऱ्याच्या सेवापुस्तिकेतच ही अफलातून नोंद १५ वर्षानंतर आढळून आली. करीम मन्सुर बेग असे या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. मजूर म्हणून रुजू झालेले करीम बेग सध्या पालिकेत दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत कर्तव्यावर आहेत. करीम बेग इयत्ता तिसरा वर्ग उत्तीर्ण आहेत.उमरेड पालिकेतील कार्यरत कर्मचारी करीम बेग यांची सेवापुस्तिका २००५ ला तयार करण्यात आली. या सेवापुस्तिकेत अन्य महत्त्वपूर्ण बाबींसह धर्म, जात असा रकाना आहे. त्या रकान्यासमोर मुसलमान (हिंदू) असे नमूद करण्यात आले आहे. शाळेच्या सर्टिफिकेट वरून नोंद घेण्यात आली, अशीही नोंद या सेवापुस्तिकेत नमूद आहे. ही बाब ‘लोकमत’च्या लक्षात येताच मुख्याधिकारी राजेश भगत यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे याबाबतच विचारणा केली असता, ही बाब खरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नोंदीमुळे करीम बेग यांना कोणतीही अडचण आली नाही. असे असले तरी त्यावेळेतील या नोंदीची तपासणी का झाली नाही, असाही प्रश्न यानिमीत्ताने निर्माण होत आहे. ‘तू हिंदु बनेंगा, ना मुसलमान बनेगा...इंसान की औलाद है इंसान बनेगा’ १९५९ ला ‘धुल का फुल’ या चित्रपटातील हे गीत आजच्या व्यवस्थेला आणि उद्भवलेल्या परिस्थितीला साजेसं असंच आहे. करीम बेग यांच्या प्रकरणात या ओळी अगदी तंतोतंत साजेशा असल्या तरी त्याच्या अडचणी वाढविणाऱ्या ठरू नयेत एवढेच !

ज्यावेळी ही सेवापुस्तिका तयार करण्यात आली, त्यावेळेस कार्यरत असलेल्या आस्थापना लिपिकाची ही चूक आहे. सध्या करीम बेग हे पालिकेत कर्तव्यावर आहेत. त्यांना याबाबत माहिती नाही. शिवाय त्यांना अद्याप कोणतीही अडचण आलेली नाही. मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी, अन्य महत्त्वपूर्ण कामांसाठी सेवापुस्तिकेतील पहिल्या पानाची नोंद अत्यावश्यक ठरत असते, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी पहिल्यांदाच ही चूक लक्षात यावयास हवी होती.राजेश भगतमुख्याधिकारी, नगर परिषद, उमरेड

टॅग्स :Governmentसरकार