शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नपुंसकतेचा आरोप पुरुषाची मानहानी करणारा; हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 09:44 IST

नपुंसकतेचा आरोप पुरुषाची मानहानी करणारा आहे. या आरोपामुळे समाजाचा पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. परिणामी, तो पुरुष ताठ मानेने जगू शकत नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी एका प्रकरणात नोंदविले.

ठळक मुद्दे पुरुषाला ताठ मानेने जगता येत नाही

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नपुंसकतेचा आरोप पुरुषाची मानहानी करणारा आहे. या आरोपामुळे समाजाचा पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. परिणामी, तो पुरुष ताठ मानेने जगू शकत नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी एका प्रकरणात नोंदविले.या प्रकरणाचे विशेष म्हणजे पत्नीने स्वत:च्या पतीवर हा गंभीर आरोप केला. त्यानंतर पतीच्या तक्रारीवरून प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने विविध पुरावे लक्षात घेता जेएमएफसी न्यायालयाची कारवाई योग्य ठरवून पत्नीचा अर्ज फेटाळून लावला. हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले.पत्नीने तिच्या एका याचिकेमध्ये पती नपुंसक असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ती याचिका दाखल करण्यापूर्वी तिने पतीला त्याची समाजामध्ये बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पतीने जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल करून पत्नीवर भादंविच्या कलम ५०० (मानहानी) व कलम ५०६ (धमकी) अंतर्गत कारवाई करण्याची विनंती केली. जेएमएफसी न्यायालयाने प्रकरणाची चौकशी केली असता पतीच्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आले. त्यामुळे २४ जुलै २०१७ रोजी पत्नी व अन्य आरोपींना नोटीस बजावण्यात आली. त्याविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयात पत्नीतर्फे अ‍ॅड. जी. एल. बजाज तर, पतीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.

अशी झाली वादाची सुरुवातपती-पत्नीचे आपसात पटत नव्हते. त्यांचे नेहमी भांडण होत होते. त्यामुळे पत्नी तिच्या दोन मुलींसह २१ नोव्हेंबर २०११ रोजी पतीची सोबत सोडून माहेरी निघून गेली. त्यानंतर पतीने पत्नीला परत आणण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. दरम्यान, पत्नीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. त्या प्रकरणामध्ये २६ एप्रिल २०१७ रोजी न्यायालयाने पतीकडे एका मुलीचा तात्पुरता ताबा दिला. त्या आदेशाविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय