शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इतरांपेक्षा आपली रेषा मोठी करा

By admin | Updated: April 3, 2015 01:54 IST

जीवनातील यशस्वीतेचा संबंध हा मेरिटशी बिलकूल नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्याची रेषा

नागपूर : जीवनातील यशस्वीतेचा संबंध हा मेरिटशी बिलकूल नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दुसऱ्याची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी करा. मी जीवनात आपली रेषा मोठी करण्याचाच प्रयत्न केला, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे केले. नागपूर शिक्षण मंडळाच्या महाल येथील दादासाहेब धनवटे ऊर्फ डी.डी.नगर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाला १४७ वर्षे पूर्ण झाली. या शाळेतून अनेक मान्यवर शिकून गेले. त्यात नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. आपल्या शाळेतील एक विद्यार्थी एकेक पायरी चढत आज देशाच्या केंद्रीय मंत्रिपदी विराजमान झाल्यानिमित्त नागपूर शिक्षण मंडळातर्फे गडकरी यांचा गुरुवारी सायंकाळी सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, नागपूर शिक्षण मंडळचे अध्यक्ष ए.के. गांधी, सचिव सुधीर बाहेती, कांचन गडकरी, शाळेचे मुख्याध्यापक अशोक डोफे व्यासपीठावर होते. याप्रसंगी गडकरी यांना शिकविणारे तत्कालीन शिक्षक, वर्गमित्र, वर्गमैत्रिणी आवर्जून उपस्थित होते. गडकरी म्हणाले, राजकारणाबाबत एक मतप्रवाह आहे. परंतु तो चुकीचा आहे. राजकारणात सर्वच वाईट नाही. मी जीवनात कधीच कुणाला काही मागितले नाही. माझा बायोडाटाही दिला नाही. मी भविष्याचा विचार करीत नाही, हेच माझ्या आनंदी असण्याचे कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय राजकारणात आल्यावर अनेकांनी मला अमुक कपडे घालण्याची गळ घातली परंतु मी कुणासाठीही बदलणार नाही. मला जे चांगले वाटते ते मी करतो. राजकारणात मी कधी खोटे बोलत नाही. सर्वांची कामे करतो. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करतो. याप्रसंगी त्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. जीवनात खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात परंतु माझ्या आईने व या शाळेने घातलेले संस्कार जीवनभर कामी आले. अनेक चांगले शिक्षक लाभले. त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. विद्यार्थी हा शिक्षकापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही आणि मला व्हायचेही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नितीन गडकरी यांचे शिक्षक किरण देशपांडे वर्गमित्र नियांत पाठक यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. वर्गमैत्रिण रेखा घुमराळकर यांनी गडकरींच्या यशस्वीतेसाठी गीत सादर केले. ए.के. गांधी यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे उपाध्यक्ष रमेश खानजोडे यांनी परिचय करून दिला. साधना पोहरे यांनी मानपत्राचे वाचन केले. अशोक डोफे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)गडकरीच भाजपच्या सत्तेचे शिल्पकारनितीन गडकरी हे विदर्भातील एकमेव नेतृत्व आहे. विदर्भात आणि महाराष्ट्रात भाजपाच्या यशाचे खरे शिल्पकार कुणी असतील तर ते नितीन गडकरीच आहेत, असे गिरीश गांधी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. गडकरी हे चतुर नसून भावूक आहे. त्यांच्या राजकारणात भावनेची आणि करुणेची धार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद ते दुसऱ्यांदा सहजपणे मिळवू शकले असते. परंतु त्यांनी ते नाकारले. सर्वधर्माच्या लोकांना जुळवून घेण्याचे काम ते करतात. विकासाच्या संदर्भात त्यांनी मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटतात. परंतु गडकरी जी राजकीय शिवीगाळ करतात, ते ऐकण्यास कुणी तयार राहत नसल्याचेही स्पष्ट केले.