शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिकचे झोन विधानसभा मतदारसंघनिहाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:59 IST

नागपूर शहरात सध्या अजनी, इंदोरा, सिव्हील लाईन्स, सी.ए.रोड या ठिकाणी वाहतूक विभागाचे झोन आहेत. या झोनची स्थापना फार पूर्वी करण्यात आली.

ठळक मुद्देआमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : शहरात वाहने व वर्दळ वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात सध्या अजनी, इंदोरा, सिव्हील लाईन्स, सी.ए.रोड या ठिकाणी वाहतूक विभागाचे झोन आहेत. या झोनची स्थापना फार पूर्वी करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या सुद्धा फार कमी होती. परंतु आजच्या परिस्थितीनुसार हे झोन सुसंगत वाटत नाही. त्यामुळे विधानसभा मतदारसंघनिहाय ट्रॅफिक झोन तयार करावे, अशी मागणी नागपुरातील भाजपाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.नागपुरात वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येत सुद्धा प्रचंड वाढ झालेली आहे. इतकेच नव्हे तर चारचाकी वाहन देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धावत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आरटीओची विभागणी करून पूर्व नागपुरात एक नवीन आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले. सध्या वाहतूक विभागाची व्यवस्था एका-एका विधानसभा क्षेत्रामध्ये तीन-तीन विभागात येते. त्यामुळे कोणत्या विधानसभा क्षेत्राचा भाग कोणत्या विभागात येतो, हेच नागरिकांना कळत नाही. पूर्व विधानसभा क्षेत्र हे उत्तर, पूर्व व दक्षिण या तिन्ही वाहतूक विभागात येते. शहरातील सर्व विधानसभा क्षेत्राची अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना चालान भरण्याकरिता व अन्य बाबतीत देखील फार त्रास सहन करावा लागतो. कोणताही कार्यक्रम करावयाचा असला तर वाहतूक विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु नागरिकांना हेच कळत नाही की त्याचा भाग कुठल्या क्षेत्रात येतो.अशाच प्रकारची स्थिती रेशनिंग विभागाची होती. ती आपण विधानसभा क्षेत्राप्रमाणे केली असल्यामुळे नागरिकांना फार दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे याच धर्तीवर ट्रॅफिक झोन विधानसभा क्षेत्रानुसार करावे, अशा मागणीचे निवेदन कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मिलिंद माने या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले. त्या अनुषंगाने गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून तातडीने कारवाई करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.