शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

सखींनी घेतल्या मेकअपच्या टीप्स

By admin | Updated: November 10, 2014 01:02 IST

सौंदर्य देवाने दिलेली भेट आहे. सौंदर्याला टिकविणे आणि आकर्षक बनविण्याचे काम मेकअप मॅन करतो. सिनेजगतात हा मेकअपमॅन सौंदर्यवतींच्या अगदी जवळचा असतो. नागपूरचाच एक मेकअपमॅन

मेकओव्हर : पंढरीदादा जुकेर यांनी उलगडला सौंदर्य सेवेचा प्रवासनागपूर : सौंदर्य देवाने दिलेली भेट आहे. सौंदर्याला टिकविणे आणि आकर्षक बनविण्याचे काम मेकअप मॅन करतो. सिनेजगतात हा मेकअपमॅन सौंदर्यवतींच्या अगदी जवळचा असतो. नागपूरचाच एक मेकअपमॅन सध्या बॉलिवृडच्या सौंदर्यवतीच्या सौंदर्यात भर घालतोय. त्याचे प्रचंड आकर्षण नागपूरकर सखींना आहे. त्यामुळेच अ‍ॅमोर ब्राईडल आर्ट व लोकमत सखी मंचद्वारे आयोजित ‘मेकओव्हर’ या कार्यक्रमात मूळचा नागपूरकर मेकअप मॅन व अ‍ॅमोर ब्राईडल आर्टचा सर्वेसर्वा अनुराग मदनकर याच्याकडून टीप्स घेण्यासाठी सखींचा चांगलाच प्रतिसाद लाभला. ‘मेकओव्हर’ या कार्यक्रमात प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त पंढरीदादा जुकेर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाला लोकमत सखी मंचच्या नेहा जोशी, श्रीकांत गडकरी, दीक्षित सर उपस्थित होते. अनुराग यांच्याहस्ते दादांचा सत्कार करण्यात आला. सिनेजगतातील जुन्या अभिनेत्रीपासून आजच्या नविन अभिनेत्रीचा मेकअप त्यांनी आपल्या हाताने केला आहे. गेल्या ६३ वर्षापासून पंढरीदादा सौंदर्य सेवेचे कार्य करीत आहे. त्यांनी आपले अनुभव यावेळी सखींपुढे मांडले. आयुष्यात प्रत्येकजण मेहनत करतो. मात्र मेहनतीला प्रामाणिक प्रयत्नांची जोड असेल तर फळ नक्कीच मिळते. अनुराग हा माझा शिष्य असून, त्याने घेतलेल्या मेहनतीमुळे हे फळ मिळाले असल्याचे दादा म्हणाले. कार्यक्रमात अनुराग यांनी नववधूचा संपूर्ण मेकअप व वेस्टर्न मेकअप करून दाखविला. मेकअपचे बेसिक, त्यातील बारकावे, घ्यायची काळजी याची माहिती दिली. वातावरणानुसार अथवा बदलत्या ऋतुनुसार, पार्टीला जातांना कुठले मेकअप करावे, याच्याही टिप्स दिल्या. त्याचबरोबर फाऊंडेशन, क्रीम, पावडर कुठले वापरावे याचीही माहिती दिली. हेअरस्टाईलचे विविध प्रकार त्यांनी करून दाखविले. प्रात्याक्षिक दाखविताना अनुरागने मार्गदर्शक निवेदनही केले. अनेक सखींनी अनुरागने दिलेल्या सर्व टीप्स नोंदवून घेतल्या. कार्यक्रमाला जुही पाहुणे, नेहा फरकसे या मेकअप मॉडेल बरोबर प्रकाश मदनकर, पुष्पा मदनकर, यश मदनकर, आश्विनी अग्निहोत्री, दिव्याश्री भावाळकर, वैशाली बालपांडे, अविनाश गोतमारे व जय सच्चिदानंद मंडळाचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन विशाखा दीक्षित यांनी केले. (प्रतिनिधी)