शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रोजीरोटी करावी की शासकीय नियमांचे पालन?

By admin | Updated: July 8, 2017 02:09 IST

जुना सुभेदार येथील दुर्गानगर माध्यमिक शाळेत येणाऱ्या पालकांशी संवाद साधला असता त्यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर काढला.

गणवेशाच्या जटिल नियमावरुन पालकांचा सरकार आणि मनपा प्रशासनाला सवाल : लोकप्रतिनिधी घेणार का दखल ? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुना सुभेदार येथील दुर्गानगर माध्यमिक शाळेत येणाऱ्या पालकांशी संवाद साधला असता त्यांनी शासनाच्या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर काढला. अनेक पालकांना सकाळीच उठून कामासाठी बाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना बँकेत खाते काढण्यासाठी लाईनमध्ये उभे राहून वेळ घालणे शक्य होत नाही. याशिवाय ६०० रुपयांच्या गणवेशासाठी ५०० आणि १००० रुपये खर्च करणे ही बाबही त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे रोजीरोटी करावी की शासकीय नियमांचे पालन करावे, असा प्रश्नही अनेक पालकांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या निर्णयाविरुद्ध नाराजीचा सूर काढला. विवेकानंदनगर हिंदी उच्च प्रा. माध्यमिक शाळा विकासनगर येथील विवेकानंदनगर शाळेत सकाळच्या सत्रात १ ते ४ वर्ग व बालवाडी भरते. जवळपास ४५० विद्यार्थी सकाळच्या सत्रात शिक्षण घेतात. शुक्रवारी या शाळेला भेट दिली असता, बालवाडी व पहिल्या वर्गातील विद्यार्थी गणवेशाविना शाळेत आले होते. इतर वर्गात विद्यार्थ्यांचे गणवेश होते. परंतु ते मागच्या वर्षीचे होते. शाळेत विचारणा केली असता, गेल्यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकाचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी गणवेशाचा निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने आतापर्यंत गणवेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे जुना गणवेश आहे, ते गणवेश घालून येतात. परंतु बालवाडी व पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे नव्याने प्रवेश झाल्याने गणवेश नसल्यामुळे ते विनागणवेश शाळेत येत आहेत. १५ आॅगस्टच्या आत गणवेश मिळतील आमच्या शाळेत साधारणत: गरीब, मजूर, कामगार वर्गाचे विद्यार्थी येतात. विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान मिळणार असल्याने आम्ही सुरुवातीपासून त्या कामाला लागलो. शिक्षकांनी जवळच्याच युनियन बँक, कॅनरा बँकेशी संपर्क साधला. आम्हाला आलेल्या सूचनेनुसार एक पत्र तयार करून, बँकेच्या मॅनेजरला दिले. त्यांनी शून्य बॅलेंसवर खाते उघडण्यास होकार दिल्याने, मुलांकडून व त्यांच्या पालकांकडून कागदपत्राची मागणी केली. आतापर्यंत जवळपास ९० टक्के खाते आम्ही उघडले आहे. १०० टक्के विद्यार्थ्यांचे खाते लवकरच पूर्ण होईल आणि १५ आॅगस्टच्या आता त्यांना गणवेश देऊ. - रजनी वाघाडे, मुख्याध्यापिका