शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ताजबाग येथे सुविधा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:17 IST

ताजबाग येथील यात्रेसाठी येणाºया भाविकांसाठी सर्व पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधांमध्ये मोबाईल टॉयलेट, पिण्याचे पाणी, आरोग्य, परिसर स्वच्छता ......

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : मोबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताजबाग येथील यात्रेसाठी येणाºया भाविकांसाठी सर्व पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधांमध्ये मोबाईल टॉयलेट, पिण्याचे पाणी, आरोग्य, परिसर स्वच्छता व साफसफाईकडे प्राधान्याने लक्ष देत ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. यावेळी ताजबाग परिसरातील कामाची त्यांनी पाहणी केली. ऊर्स आयोजनाबाबतच्या बैठकीदरम्यान उपस्थित अधिकाºयांना सूचना दिल्या.मोठा ताजबाग येथील सभागृहात आयोजित बैठकीदरम्यान आ. सुधाकर कोहळे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, ताजबाग ट्रस्टचे प्रशासक गुणवंत कुबडे, कार्यकारिणी समितीचे सदस्य सय्यद जिलानी, साहाय्यता समितीचे सदस्य अयान खान उपस्थित होते. ताजबाग परिसरातील विकास कामे वेगाने सुरू असून यात्रेसाठी येणाºया भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून कडक बंदोबस्ताची कार्यवाही पोलीस विभागाकडून करण्यात येईल. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता या सुविधा १० आॅक्टोबरपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या.दीक्षाभूमीप्रमाणे नियोजनाचे प्रयत्नदीक्षाभूमी येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेने केलेल्या नियोजनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक करण्यात आले असून ताजबाग उर्ससाठी देण्यात येणाºया सुविधांच्या नियोजनासाठी प्रयत्नरत आहोत, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी ताजबाग ट्रस्ट व विविध विभागांच्या उपस्थित अधिकाºयांना आढावा बैठकी दरम्यान सांगितले.