शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर सुविधा उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:39 IST

दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून येणाºया अनुयायींंसाठी पाणी, शौचालय, दिवे अशा सोईसुविधा उपलब्ध कराव्यात. परिसर स्वच्छ राहील यासाठी नियोजनानुसार ......

ठळक मुद्देआयुक्तांचे निर्देश : सोईसुविधांचा आढावा घेतला

लोकमत न्यून नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून येणाºया अनुयायींंसाठी पाणी, शौचालय, दिवे अशा सोईसुविधा उपलब्ध कराव्यात. परिसर स्वच्छ राहील यासाठी नियोजनानुसार अधिकाºयांनी जबाबदारी पार पाडावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांनी रविवारी दिले. दीक्षाभूमी परिसराची पाहणी करून त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला.अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मारक समितीचे विश्वस्त डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, प्रदीप राजगिरे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जयस्वाल, डी. डी. जांभूळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (वैद्यकीय) डॉ. अनिल चिव्हाणे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, डॉ. अनमोल टेंभुर्णे, उपअभियंता राजेश रहाटे, उद्यान निरीक्षक अमोल चोरपगार, उपअभियंता रवींद्र मुळे, सिद्धार्थ म्हैसकर आदी उपस्थित होते. स्नानगृहाकरिता पाणी पुरवठा करण्यात येतो. पिण्याकरिता स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अस्थायी नळ उभारण्यात येतात. परिसरातील सफाईकरिता मनपाच्या स्वास्थ विभागांतर्गत (स्वच्छता) केली जाते. यासोबतच लोककर्म विभागांतर्गत शामियाने, बॅरिकेट्स, अस्थायी शौचालय व स्नानगृहे उभारण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ महापालिके चे नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या परिसरात अतिरिक्त ६४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.विद्युत विभागाअंतर्गत प्रखर दिवे, पथदिवे, हॅलोजन लावले जात आहेत. परिसरात जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.अग्निशमन विभागातर्फे आगीचे बंब तसेच आरोग्य विभागातर्फे अ‍ॅम्बुलन्स दीक्षाभूमी परिसरातील पोलीस नियंत्रण कक्षाजवळ २४ तास तैनात करण्यात येणार आहे. या कामाचा आयुक्तांनी आढावा घेतला.