शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता रेशनवर मिळणार मका व ज्वारीही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST

जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका -७,५७,३५२ प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - १,३२,००५ अंत्योदय शिधापत्रिका -१,०८,६१७ एपीएल शिधापत्रिका - ५,१६, ७३० लोकमत न्यूज ...

जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका -७,५७,३५२

प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - १,३२,००५

अंत्योदय शिधापत्रिका -१,०८,६१७

एपीएल शिधापत्रिका - ५,१६, ७३०

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्राधान्य गटातील लोकांसाठी रेशनच्या दुकानात आता मका व ज्वारीही शासनाने उपलब्ध करून दिली आहे. फेब्रुवारीपासून त्याचे वितरण होणार असल्याचे सांगितले जााते.

नागपूर जिल्ह्यात एकूण ७ लाख ५७ हजार ३५२ रेशनकार्डधारक आहेत. यात ३ लाख ८९ हजार ५६४ कार्डधारक ग्रामीण भागात तर ३ लाख ६७ हजार ७८८ कार्डधारक शहरातील आहेत. दोन्ही मिळून विचार केला तर जिल्ह्यात प्राधान्य गट असलेले कार्डधारक १ ,३२,००५ व १,०८,६१७ अंत्योदय कार्डधारक आहेत. यांना याचा लाभ मिळणार आहे. मका व ज्वारी उपलब्ध होणार असली तरी यासाठी हक्काचा गहू मात्र कमी केला जाणार आहे. मका किंवा ज्वारी ही केवळ एक किलोच मिळेल. मका किंवा ज्वारी हवी असेल तर एक किलो गहू कमी दिला जाईल.

(बॉक्स)

एक किलोला एक रुपया

अंत्योदय व प्राधान्य गटासाठी ज्वारी व मका रेशनवर उपलब्ध आहे. एक रुपया किलो याप्रमाणे हा उपलब्ध आहे. सोबतच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांसाठी प्रति व्यक्ती दोन रुपयेप्रमाणे तीन किलो गहू व तीन रुपयेप्रमाणे दोन किलो तांदूळ तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी प्रति शिधापत्रिका दोन रुपयेप्रमाणे १५ किलो गहू व तीन रुपयेप्रमाणे २० किलो तांदूळ मिळेल. मका किंवा ज्वारी घेतली तर एक किलो गहू कमी मिळेेल.

कोट

रेशनच्या दुकानात ज्वारी व मका देण्याची योजना आहे. शासनाची ही योजना तशी जुनीच आहे. ज्या ठिकाणी ज्वारी व जिथे मका उपलब्ध होईल तिथे मका उपलब्ध करून दिले जातो. प्रत्येक रेशनकार्ड १ रुपयात १ किलो याप्रमाणे दिले जाते. ज्यांना मका किंवा ज्वारी हवी असेल त्यांना एक किलो गहू कमी दिला जातो.

भास्कर तायडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे

लाभार्थी काय म्हणतात?

चांगली योजना आहे

शासनाने रेशनच्या दुकानात ज्वारी व मका उपलब्ध करून दिली ते चांगले आहे. ज्वारी खाणाऱ्यांची संख्याही माोठ्या प्रमाणावर आहे. सध्या शहरात राहणाऱ्यांना ज्वारी मिळणेही कठीण आहे. अशा परिस्थितीत त्यांना रेशनच्या दुकानातच ज्वारी मिळू लागली तर चांगलेच आहे.

सुखदेव डोंगरे

लाभार्थी

गहू कमी करू नये

रेशनवर मका व ज्वारी दिली जात असल्याचे स्वागतच आहे. परंतु त्यासाठी गहू कमी केला जाऊ नये. प्राधान्य गटाला केवळ तीन किलो गहू मिळतो. यात एक किलो गहू कमी करणे योग्य होणार नाही. दोन्ही कायम असावे.

सुभाष गडलिंग

लाभार्थी