शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपीच्या वकिलाची माघार

By admin | Updated: December 17, 2014 00:30 IST

लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी मुख्य आरोपीच्या वकिलाने खटला लढण्याचे अधिकारपत्र परत घेतल्याने, आज होणारी आरोप

अपहरण-हत्या प्रकरण : आरोप निश्चित होण्याची प्रकिया लांबणीवरनागपूर : लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय युग चांडक अपहरण-हत्याप्रकरणी मंगळवारी मुख्य आरोपीच्या वकिलाने खटला लढण्याचे अधिकारपत्र परत घेतल्याने, आज होणारी आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडली. मुख्य आरोपी राजेश धनालाल दवारे (१९) रा. वांजरी ले-आऊट कळमना याचे वकीलपत्र अ‍ॅड. अशोक भांगडे यांनी घेतले होते. लकडगंज पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर ते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले होते. आज आरोप निश्चित होणार होते. परंतु अचानक भांगडे यांनी खटला लढण्याचे अधिकारपत्र परत घेतल्याने न्यायालयापुढे नवा पेच निर्माण झाला. न्यायालयाने ज्या निष्णात वकिलांना आरोपी राजेश दवारे याचा खटला लढण्यासाठी विचारणा केली, त्यांनी चक्क नकार दिलेला आहे. न्यायालयाने वकील नेमण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंत आरोपी राजेशला संधी दिली आहे. मुदतीत तो वकील नेमण्यास अपयशी ठरल्यास ‘लीगल एड’मार्फत शासनाच्या खर्चाने वकील नेमण्याची कायद्यात तरतूद आहे. या प्रकरणात राजेश दवारे, त्याचा मित्र अरविंद अभिलाष सिंग (२३) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका आणि विधी संघर्षग्रस्त बालक, असे तीन आरोपी आहेत. विधी संघर्षग्रस्त बालकाविरुद्ध बाल न्यायालयात खटला चालणार आहे. गुन्ह्याच्या कटात सहभागी असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ‘मम्मी हास्पिटल में बुला रही है’, अशी थाप मारून युग याचे स्कूटीने अपहरण करण्यात आले होते. युग हा सेंटर पॉर्इंट शाळेचा दुसऱ्या इयत्तेचा विद्यार्थी होता. त्याचे वडील डॉ. मुकेश चांडक दंत तज्ज्ञ असून त्यांचे दोसरभवन चौकात क्लिनिक आहे. अपहरणाच्या दिवशीच दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात निष्पाप, निरागस युगचा खून करण्यात आला होता. मुख्य आरोपी राजेश याने २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता कबुली देऊन मृतदेह काढून दिला होता. मृतदेह रेतीने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. (प्रतिनिधी)गुदमरून मृत्यूयुगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय शवविच्छेदन अहवालात आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर २६ जखमा होत्या. आरोपींकडून खंडणीसाठी दोनवेळा फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव मोहसीन खान असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयाची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव सांगितले नव्हते. ‘युग हमारे कब्जे मे है, ५ करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बंबई मे पैसे लेकर आना’, असेही त्याने म्हटले होते. या प्रकरणी आरोपींची ओळखपरेड घेण्यात आलेली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर प्राप्त करण्यात आलेला आहे. १०० साक्षीदारया खटल्यात १०० जणांना साक्षीदार करण्यात आले असून, २९० पानांचे आरोपपत्र आहे. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत. सरकार पक्षाच्या वकील ज्योती वजानी आहेत. तर दुसरा आरोपी अरविंद सिंग याचे वकील अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय आहेत. आज दोन्ही आरोपी न्यायालयात हजर होते.