शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना रोजगार मुख्य प्राथमिकता

By admin | Updated: August 29, 2015 03:01 IST

विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे.

नितीन गडकरी : मागास व आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा प्रयत्ननागपूर : विदर्भाच्या विकासासाठी उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकार या दिशेने प्रयत्नरत आहे. याचा प्रारंभ मिहानमध्ये झाला आहे. रिलायन्स समूहामुळे औद्योगिक घराणे नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे युवकांना रोजगार मिळेल. देशातील मागास आणि आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा सरकारचा प्रयत्न आहे. अलीकडेच गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.(प्रतिनिधी)विमानतळासाठी जागतिक निविदानागपूर विमानतळासाठी लवकरच जागतिक निविदा काढण्यात येणार आहे. येथील एमआरओमध्ये मलेशिया, चीन, इंडोनेशिया यासह जगभरातील विमाने देखभाल व दुरुस्तीसाठी यावीत, यासाठी विमान दुरुस्ती कर माफ करावा, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे गडकरी यांनी सांगितले. उद्योगांना स्वस्त वीज : बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मिहान-सेझमधील उद्योगांना जनरेटरवर अवलंबून राहावे लागत होते. आता अखंड वीज येथील उद्योगांना देण्यात येत आहे. त्यांचा युनिट दर ४.४० रुपये असून तो पुढेही कायम राहील. अंबानी यांच्या उद्योगांनाही प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच दरात वीज देण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. मिहान झाले ‘महान’ : देसाईसुभाष देसाई म्हणाले, अनिल अंबानीच्या प्रकल्पामुळे मिहान आज ‘महान’ झाला आहे. ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ची मोहीम यशस्वी करावी लागेल. यासाठी राज्य सरकार उद्योगांना जमीन, वीज आणि अन्य पायाभूत सुविधा देण्यास तयार आहे. मिहानमध्ये धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क आल्यामुळे विदर्भातील लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल. फडणवीस दूरदृष्टी असणारे नेतेअनिल अंबानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुक्तकंठाणे प्रशंसा केली. फडणवीस यांचा साधेपणा, मैत्रीपूर्ण व्यवहार व काटेकोरपणा वाखाळण्याजोगा आहे. राज्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. हा प्रकल्पासाठी त्यांनी केलेले प्रयत्न व जमीन हस्तांतरणासाठी दाखविलेली तत्परता प्रशंसनीय आहे. महाराष्ट्र नंबर एकचे राज्य करण्यासाठी रिलायन्सचे त्यांना नेहमी सहकार्य राहील, असेही ते म्हणाले.