शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सुरक्षित दिवाळीसाठी महावितरणच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 20:35 IST

दिवाळीत दुर्देवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतषबाजी यामुळे दुर्दैर्वी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे, अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने या दुर्देवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या दिवशी फटाक्याने लागलेल्या आगीच्या घटना दरवर्षीच हजारोच्या संख्येने होत असतात, यात केवळ आर्थिकच नव्हे तर जीवित हानीही मोठ्या प्रमाणात होत असते. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासीनता यामुळे या घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महावितरणने काही खबरदारीचे उपाय सुचविले असून त्यावर अंमलबजावणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे, त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करताना ते मोकळ्या जागेतच लावावेत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दूर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा, तुटलेल्या वीज तारा वापरू नये किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करुन घ्यावेत, तुटलेले सॉकेट्स वापरू नये, घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत. फटाके उडविल्यानंतर त्याचा होणारा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका, त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.हे लक्षात असू द्याफटाके उडविताना मोकळ्या जागेतच उडवावेतवीज तारांच्याजवळ फटाके उडवू नयेविजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नयेविद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नयेरोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात.फटाक्यांचा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणDiwaliदिवाळी