शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

महावितरणची सौर ऊर्जा निर्मितीत घोडदौड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 20:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेला आणि शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ६६५ कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. महावितरणने नागपूर जिल्ह्यातील खापा येथील ९०० कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पापाठोपाठ बुटीबोरी येथील या प्रकल्पाची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देखापानंतर बुटीबोरी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणीही यशस्वी : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेला आणि शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ६६५ कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. महावितरणने नागपूर जिल्ह्यातील खापा येथील ९०० कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पापाठोपाठ बुटीबोरी येथील या प्रकल्पाची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.महावितरणच्या बुटीबोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्र्रातील सुमारे अडीच एकर मोकळ्या जागेत या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून या प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळी येथून तब्बल ३०१ के.वॅ. ऊर्जा निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असून या प्रकल्पांतून परिसरातील शेतकऱ्यांना सौर वीज वाहिनीतून वीजपुरवठा करण्यात येईल.मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी राज्यभरातील विविध ठिकाणी असलेल्या महावितरणच्या वीज उपकेंद्रातील उपलब्ध मोकळ्या जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत योजना तयार केली असून या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील उपकेंद्रात ९०० कि.वॅ. तर बुटीबोरी येथील उपकेंद्रातील ६६५ कि.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू करण्यात आले आहेत. खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्पातूनही तब्बल ५०० कि.वॅ. पर्यंत ऊर्जा निर्मितीची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुमारे १५० ठिकाणी विविध क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून २०० मे. वॅ. वीज निर्मिती करण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी महावितरणने प्रकल्प उभारणी आणि वीज खरेदीसाठीचे करारही केले असून. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा महावितरणची आहे तर प्रकल्प उभारणीचे काम ईईएसएल या कंपनीतर्फे करण्यात येत आहे. बुटीबोरी येथील प्रकल्पातून सुमारे ३०० शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणार असून शेतकऱ्यांना दिवसा १० ते १२ तास दर्जेदार आणि स्वस्त वीज मिळावी याकरिता राज्य शासनातर्फे ही योजना राबविल्या जात आहे.