शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला वादळाचा फटका

By admin | Updated: May 30, 2017 01:39 IST

रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाचा महावितरणच्या वीज यंत्रणेला जबर फटका बसला.

६९ वीजखांब जमीनदोस्त : वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रविवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसाचा महावितरणच्या वीज यंत्रणेला जबर फटका बसला. यात काँग्रेसनगर आणि बुटीबोरी विभागात उच्चदाब वीज वाहिनीचे १५ तर लघुदाब वीज वाहिनीचे ५४ असे एकूण ६९ वीजखांब जमीनदोस्त झाले. यामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा प्रभावित झाला होता, मात्र महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करीत सुमारे ४० टक्के भागातील वीजपुरवठा अवघ्या अर्ध्या तासात पूर्ववत केला. तसेच रात्री ९ वाजतापर्यंत प्रभावीत भागापैकी ९० टक्के भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले होते. उर्वरित भागातील वीजपुरवठा मध्यरात्रीपर्यंत सुरू करण्यात आला होता. या वादळामुळे ६९ वीजखांबांसोबतच ८.११ किमी लांबीची वीज वाहिनी क्षतिग्रस्त झाली आहे. तसेच ११ वितरण रोहित्रे नादुरुस्त झाली असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यातच अनेक वीजतारांमध्ये झाडाच्या फांद्या आणि जाहिरातींचे होर्डिंग्ज पडल्याने दुरुस्तीच्या कामात व्यत्यय येत आहे. मात्र तरीही महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रात्रीचा दिवस करीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले. यात महत्त्वाचे म्हणजे, महावितरणने योग्यरीत्या मान्सूनपूर्व तयारी केल्याने वादळातही महावितरणच्या कुठल्याही उपकेंद्रात बिघाड झाला नाही, शिवाय त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. ग्राहकांना आवाहन महावितरणने ग्राहकांसाठी कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपवरूनही वीज बंद असल्याची तक्रार नोंदविता येते. त्यामुळे ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा लांब फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. असा संभाव्य धोका निर्माण करणाऱ्या झाडांची किंवा फांद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.