शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मनपात महाविकास आघाडी कठीणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:09 IST

- राष्ट्रवादी म्हणते, एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक आहे हे विसरू नका कमलेश वानखेडे नागपूर : राज्यात शिवसेना, ...

- राष्ट्रवादी म्हणते, एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक आहे हे विसरू नका

कमलेश वानखेडे

नागपूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असले तरी नागपूर महापालिकेच्या अगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्यता दिसत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली असून, नागपूर शहर काँग्रेसनेही या भूमिकेचे भक्कम समर्थन केले आहे, तर काँग्रेसच्या या ताठर भूमिकेला फारसे महत्त्व न देता राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येण्याची तयारी चालविली आहे. विशेष म्हणजे गेली निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होती. आता एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने आहे, हे काँग्रेसने विसरू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत नागपुरात काँग्रेसने कधीच राष्ट्रवादीला फारसे महत्त्व दिलेले नाही. २०१२ मध्ये काँग्रेसने आघाडी करीत राष्ट्रवादीला ३० जागा सोडल्या; पण राष्ट्रवादीला फक्त ६ जागा जिंकता आल्या. २०१७ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांत आघाडीसाठी तीन फेऱ्यांत चर्चा झाली. शेवटी काँग्रेसने १५१ पैकी फक्त १८ जागा देण्याची तयारी दर्शविली. मात्र, राष्ट्रवादीने हा सन्मानजनक प्रस्ताव नसल्याचे सांगत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीने प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीरिपा सोबत हात मिळविला. मात्र, २०१२ पेक्षाही वाईट निकाल लागला. राष्ट्रवादीच्या घड्याळात तीन काटेही उरले नाहीत. एकमेव नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी विजय मिळवीत इज्जत राखली. आघाडी न करण्याचा फटका काँग्रेसलाही बसला. काँग्रेस २९ पर्यंत खाली घसरली. सुमारे दहा ते १२ जागांवर काँग्रेसलाही नुकसान सहन करावे लागले.

यावेळीही काँग्रेसने स्वबळाचा नारा देत ताठर भूमिका घेतली आहे. आघाडी करायची झाली तर राष्ट्रवादी अव्यवहार्य भूमिका घेते व ५० जागांपासून सुरुवात करते. यात वेळ जातो. साध्य काहीच होत नाही. शिवाय पुन्हा शिवसेनेला सोबत घेतले तर ते ३० ते ३५ जागा मागतील. या दोन्ही पक्षाला ५० टक्के जागा दिल्या तर एवढी वर्षे राबणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे, असा मुद्दा काँग्रेस नेत्यांनी समोर केला आहे. आघाडी नकोच याला स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भक्कम पाठबळ दिले आहे.

चार सदस्यांचा प्रभाग विस्ताराने खूप मोठा असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांची शक्ती कमी पडत होती. मात्र, आता महापालिकेची निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे काँग्रेसनेही भ्रमात राहू नये. राष्ट्रवादीला कमी लेखण्याची किंमत पुन्हा एकदा काँग्रेसला मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.

राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येणार

- काँग्रेसची ताठर भूमिका पाहता राष्ट्रवादीनेही आपली रणनीती बदलली आहे. आघाडी करण्यासाठी काँग्रेससमोर लाचारी पत्करण्यापेक्षा शिवसेनेशी आपले बंधन अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. दोन्ही पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तशी प्राथमिक चर्चा झाली आहे. २०१२ मध्ये भाजपशी युती करून करून लढलेल्या शिवसेनेला ६ जागा जिंकता आल्या. २०१७ मध्ये स्वबळावर लढून फक्त दोन नगरसेवक विजयी झाले. अशात राष्ट्रवादीच्या साथीने आपली विस्कटलेली घडी नीट करण्याची शिवसेनेची योजना आहे.

कार्यकर्त्यांसाठी स्वबळावरच लढणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तीच नागपूर शहर काँग्रेसची भूमिका होती. नागपुरात राष्ट्रवादीसोबत युतीच्या वाटाघाटी करतानाचे अनुभव चांगले नाहीत. शहरात काँग्रेसचा व्याप मोठा असून, प्रत्येक वॉर्डात तगडे कार्यकर्ते आहेत. महायुती करून लढलो तर सक्षम कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. त्यामुळे काँग्रेस स्वबळवरच लढेल.

- आ. विकास ठाकरे,

नागपूर शहर अध्यक्ष, काँग्रेस

काँग्रेसचेच अधिक नुकसान

- भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे. मात्र, निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत भांडणात आम्ही पडलो तर आमचेही नुकसान होईल. राष्ट्रवादीला शहरात गमविण्यासारखे काहीच नाही. उलट आमचे शहरात संघटन तयार होईल; पण आघाडी नाही केली तरी काँग्रेसचेच नुकसान अधिक आहे. यावेळी निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने आहे, हे काँग्रेसने विसरू नये.

- दुनेश्वर पेठे,

शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मनपाच्या दोन निवडणुकीतील चित्र

पक्ष २०१२ २०१७

काँग्रेस ४३ २९

राष्ट्रवादी ०६ ०१

शिवसेना ०६ ०२