शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

   यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 19:51 IST

Nagpur News यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना १०० एकर जागा शोधण्याची सूचना

नागपूर : यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. येथे राज्यातील १ लाख ९२ हजार सरपंच तसेच ग्रामविकासात काम करणारे अधिकारी- कर्मचारी अशा सुमारे ३ लाख लोकांना प्रशिक्षण देण्याची सोय राहील. हे केंद्र उभारण्यासाठी नागपूर परिसरात १०० एकर जागेचा शोध घेण्याच्या सूचना नागपूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.मुनगंटीवार म्हणाले, येथे प्रत्यक्ष व स्क्रीनद्वारेही प्रशिक्षणाची सोय असेल. प्रशिक्षणार्थीच्या निवासासाठी आमदार निवास येथील व्यवस्था अपग्रेड केली जाईल. ग्राम विकास खात्याची ही योजना असून, सांस्कृतिक विभाग नोडल एजंसी म्हणून हा प्रकल्प साकारेल. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच चंद्रपूर येथे एसएनडीटीचे स्कील डेव्हलपमेंटचे उपकेंद्र उभारण्यासाठी ५५ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोंडवाना विद्यापीठाला ट्रायबल ॲण्ड फॉरेस्ट युनिव्हर्सिटीचा दर्जा

- गोंडवाना विद्यापीठाला ट्रायबल ॲण्ड फॉरेस्ट युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. यासाठी उच्च शिक्षण विभागाला कायदा करावा लागेल. येत्या हिवाळी अधिवेशनात किंवा मार्चच्या अधिवेशनात संबंधित कायदा मंजूर केला जाईल. ट्रायबल दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठाला केंद्र सरकारच्या आदिवासी खात्याचा निधी तसेच आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचा मार्ग सुकर होईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

आशा भोसले यांना नागपुरात देणार ‘महाराष्ट्र भूषण’

- प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार नागपुरात हिवाळी अधिवेशन काळात २१ डिसेंबर रोजी प्रदान करण्याची तयारी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने चालविली आहे. यानिमित्त यशवंत स्डेडियम येथे दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून येथेच हा सोहळा पार पडेल, असे नियोजन सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे