शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

महाराष्ट्र सुसंस्कृत करण्याचे स्वप्न

By admin | Updated: October 29, 2014 00:44 IST

स्वाभाविकपणे मुलाच्या देदीप्यमान यशाने कुठलीही माता हुरळून जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा देवेंद्र यांची माता सरिता करीत होत्या.

आई सरिता फडणवीस यांना विश्वासनागपूर : स्वाभाविकपणे मुलाच्या देदीप्यमान यशाने कुठलीही माता हुरळून जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा देवेंद्र यांची माता सरिता करीत होत्या. सातत्याने त्या दूरचित्रवाहिनीसमोर बसून होत्या. घरात कार्यकर्त्यांची गर्दी आणि बाहेर जल्लोषाचे वातावरण. त्यामुळे सरिता फडणवीस शांतपणे त्यांच्या बेडरूममध्ये टीव्हीसमोर होत्या. देवेंद्र यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे शांत स्मितहास्य उमटले. आत्ता या क्षणाला आई म्हणून काय वाटतंय? असे विचारले असता त्या म्हणाल्या, देवेंद्रने महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त, महिलांना सुरक्षितता प्रदान करणारा आणि सुसंस्कृत करावा. सत्ता केवळ सेवेसाठी असते, हाच त्याचा संस्कार आहे, त्यामुळे त्याच्याकडून मलाही खूप अपेक्षा आहे. सामान्य आणि तळागाळातल्या माणसाचे जगणे त्याने सुसह्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज गंगाधरराव असते तर...असे विचारले असता त्यांनी गंगाधरराव असते तर देवेंद्र राजकारणात आलाच नसता, असे सांगितले. पण वडील गेल्यावर तो राजकारणात आला, कारण त्याने वडिलांचे काम अनुभवले होते. हे काम आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो राजकारणात आला. एकदा गंगाधरराव विमानाने मुंबईला गेले त्यावेळी देवेंद्रला खूप आकर्षण वाटले. आयुष्यात कधी विमानात बसायला मिळेल, असे वाटत नाही, असे तो त्यावेळी बोलला होता. पण आज देवेंद्र रोज विमानानेच मुंबईला जातो, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)पायनॅपल आईसगोला खाणारा मुख्यमंत्रीशाळेत असताना आम्ही सारेच सरस्वती हायस्कूलमध्ये बसने जायचो. पण आम्हाला आईसगोला खूप आवडायचा. त्यामुळे आम्ही बसचे पैसे वाचवून पायी जायचो आणि आईसगोला खायचो. देवेंद्रला त्यावेळी पायनॅपल आईसगोला खूप आवडायचा. आत्ताही आवडतो. फक्त प्रकृतीमुळे आता अम्हाला खाणे जमत नाही; पण देवेंद्रला आईसगोला अजूनही आवडतो, अशी आठवण यावेळी कुणाल एकबोटे यांनी सांगितली.