लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी २७ आॅक्टोबरला नागपुरात होत आहे. वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र(वनामती) येथील आॅडिटोरियम येथे सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.महापौर परिषदेला राज्यातील २२ शहरातील महापौर उपस्थित राहतील. महापौर परिषदेचे अध्यक्ष व बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नेतृत्वात महापौरांच्या विविध १६ विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानतंर नागपूर शहरातील महापालिकेच्या उपक्रमांना व विकास प्रकल्पांना महापौर भेटी देतील, अशी माहिती जिचकार यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, संदीप जाधव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
नागपुरात महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी : २२ महापौर उपस्थित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:51 IST
महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी २७ आॅक्टोबरला नागपुरात होत आहे. वसंतराव नाईक कृषी अनुसंधान केंद्र(वनामती) येथील आॅडिटोरियम येथे सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
नागपुरात महाराष्ट्र महापौर परिषद शनिवारी : २२ महापौर उपस्थित राहणार
ठळक मुद्देमहापौर नंदा जिचकार यांची पत्रकार परिषद