शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिष्यवृत्तीत महाराष्ट्र मागेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:10 IST

------------------------ केंद्राला शक्य ते राज्याला काही नाही : दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र कितीतरी पुढे आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क ...

------------------------

केंद्राला शक्य ते राज्याला काही नाही :

दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र कितीतरी पुढे

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पुरोगामी राज्य म्हणून मिरविणारे महाराष्ट्र हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात देशातील इतर राज्यांमध्ये प्रचंड मागे आहे. त्याच्या तुलनेत दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र ही राज्ये कितीतरी पुढे आहेत. आकड्यांचाच विचार केला तर महाराष्ट्र सरकार हे दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविते, तर कनार्टक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील दरवर्षीची संख्या तब्बल ४०० ते ५०० विद्यार्थी इतकी आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची संधी मिळावी, याकरिता महाराष्ट्रात २००३ पासून परदेशी शिष्यवृत्ती योजना शासनाने लागू केली आहे; परंतु मागील काही वर्षांपासून ७५ विद्यार्थ्यांची संख्या कायम आहे ती वाढलेली नाही. त्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे. केंद्र सरकारसह विविध राज्यांतर्फेही परदेशी शिष्यवृत्तीची योजना राबविली जाते. केंद्र सरकार या योजनेंतर्गत दरवर्षी १०० विद्यार्थांचा खर्च उचलते. दिल्लीसारखे छोटे राज्यही १०० मुलांना परदेशात पाठविते. कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकार प्रत्येकी ४०० मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठविते, तर तेलंगणा सरकार ५०० मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविते. केरळ सरकारतर्फे तर विद्यार्थ्यांची कुठलीही मर्यादाच नाही. जितके विद्यार्थी अर्ज करतील त्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

- बॉक्स

- १० वर्षांत ४७५ विद्यार्थी वंचित

राज्य सरकारतर्फे प्रत्येक विभागानुसार व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले होते. त्यानुसार सामाजिक न्याय विभागानेही आपले डॉक्युमेंट तयार केले. त्यात परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १०० इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७ फेब्रुवारी २०१० च्या मंत्रिमंडळात याबाबतचा निर्णय घेण्यात आला; परंतु केवळ ५० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्यात आली. २०१७-१८ पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या कायम हाेती. २०१८-१९ मध्येही संख्या ७५ करण्यात आली. त्यामुळे २०१८-१९ पर्यंत ४०० विद्यार्थी आणि गेल्या तीन वर्षांत ७५ असे एकूण ४७५ विद्यार्थी राज्य सरकारमुळेच परदेशी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. व्हिजन डॉक्युमेंटनुसार २०१० पर्यंत ही संख्या १००, २०२० पर्यंत २०० व २०३० पर्यंत ३०० करण्यात येणार होती. सध्या २०२१ सुरू आहे. अजून १०० पर्यंतच विद्यार्थी पोहोचले नाही. तेव्हा व्हिजन डॉक्युमेंटची अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.