शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Gram Panchayat Election Results;  नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:01 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनेलला आतापर्यंत ५० हून ग्रा.पं.मध्ये यश मिळाले आहे.

ठळक मुद्देआजी माजी मंत्र्यांनी गाव राखले, जि.प.च्या विरोधी पक्ष नेत्याला धक्कानागपूर ग्रामीणमध्ये भाजपची मुसंडी 

जितेंद्र ढवळे 

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२७ ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी समर्थित पॅनेलला आतापर्यंत ५० हून ग्रा.पं.मध्ये यश मिळाले आहे. कामठी तालुक्यातील कोराडी ग्रा.पं.राखण्यात भाजपाचे महामंत्री माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. येथे भाजपा समर्थित आर्दश ग्राम निर्माण पॅनेलचा १७ पैकी १२ जागावर तर महाविकास आघाडीचा ५ जागांवर विजय झाला आहे. गतवेळी येथे भाजप समर्थित पॅनेलचा १७ पैकी १७ जागावर विजय मिळविला होता. यावेळी कोराडीत काँग्रेसचे जि.प.सदस्य नाना कंभाले यांनी भाजपला काहीसा धक्का दिला आहे. सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रा.पं. राखण्यात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना यश आले आहे. येथे १७ पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. १४ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थित पॅनेलला १३ तर भाजप समर्थित पॅनेलचा एका जागेवर यश मिळाले आहे.कामठी तालुक्यात महालगाव ग्रा.प.च्या निकालात काँग्रेस समर्थित गटाचे ४, भाजप समर्थीत गटाचे ३ तर तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे. येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांना काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे.कळमेश्वर तालुक्यात ५ पैकी ४ जागावर काँग्रेस समर्थित पॅनेलचा विजय झाला आहे. येथे सोनपूर (आदासा) ग्रा.पं.निवडणूक बिनविरोध झाली होती. येथे सोनेगाव ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-७, भाजपा-२, कोहळी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-७, भाजपा-२ आणि दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. सेलू ग्रा.पं.मध्ये काँग्रेस-५ तर भाजपा-४ आणि सावंगी ग्रा.प.मध्ये काँग्रेसच्या तिन्ही गटाला यश मिळाले आहे. रामटेक तालुक्यात ९ पैकी ७ ग्रा.पं.वर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. नरखेड तालुक्यातील १७ ग्रा.पं.च्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (महाविकास आघाडीने) मुंसडी मारली आहे. येथे माणिकवाडा ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादी समर्थित पॅनेलने ९ पैकी ६ जागावर विजय झाला आहे. येथे मदना ग्रा.पं.त शिवसेना समर्थित पॅनेलला यश मिळाले आहे. येथे ग्रामविकास आघाडीला ६ तर ग्राम परिवर्तन पॅनेलला एका जागेवर यश मिळाले आहे. जामगाव (खुर्द) ग्रा.पं.वर भाजपाने राष्ट्रवादी समर्थित पॅनेलवर ८-१ विजय मिळविला आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक