शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : मुख्यमंत्र्यांची 'ग्रॅन्ड हॅटट्रिक' रोखणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:26 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा येथून १ लाखाहून अधिक मतांनी विजय व्हावा व मतदारसंघातून ‘ग्रॅन्ड हॅटट्रिक’ व्हावी यासाठी प्रचारयंत्रणा राबत आहे.

ठळक मुद्देनव्या उमेदवारामुळे कॉंग्रेसची दमछाक : बसप, वंचित बहुजन आघाडीचेदेखील आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांचा येथून १ लाखाहून अधिक मतांनी विजय व्हावा व मतदारसंघातून ‘ग्रॅन्ड हॅटट्रिक’ व्हावी यासाठी प्रचारयंत्रणा राबत आहे. तर कॉंग्रेसकडे तुलनेने नवीन उमेदवार असल्यामुळे मतदारांची नस शोधताना त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. बसप व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारालादेखील प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.२००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून भाजपकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस हेच येथून उमेदवार आहेत. त्यांची ही पाचवी निवडणूक राहणार आहे. दोन वेळा ते पश्चिम नागपुरातून निवडून आले होते व २००९, २०१४ मध्ये दक्षिण-पश्चिममधून त्यांनी विजय मिळविला. मागील निवडणुकीत तर ५८ हजारांहून अधिक मतांनी विजयी होत नागपूर शहरातून आतापर्यंतच्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. २०१४ सालापासून पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनीदेखील कामाचा व्याप असतानादेखील या मतदारसंघाकडे जातीने लक्ष ठेवले. शिवाय स्थानिक भाजप नेत्यांकडे येथील मतदारांशी कायम संपर्क साधण्याची जबाबदारी होतीच. त्यामुळे मतदारांशी भाजपचे ‘कनेक्ट’ कायम राहिला. भाजपची येथे परंपरागत ‘व्होटबँक’ असून नवीन मतदारदेखील मोठ्या प्रमाणात जुळले आहेत. प्रचारादरम्यान दररोज सकाळी निघणाऱ्या पदयात्रांमध्ये याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. शिवाय ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून प्रचाराची समांतर यंत्रणा उभारण्यात आली असून मतदारांशी निरंतर संवाद साधण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत भाजपने राबविलेल्या बूथप्रमुख, पेजप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघात संघटन मजबुतीवर भर देण्यात आला होता. त्याचा फायदा भाजपला आता होत असून प्रचाराची ‘ब्ल्यू प्रिंट’ फार अगोदर तयार करण्यात आली होती.दुसरीकडे कॉंग्रेसचे डॉ.आशिष देशमुख हे मतदारसंघासाठी नवीनच उमेदवार आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत कॉंग्रेसचा उमेदवार निश्चित झाला नव्हता. ही बाब कॉंग्रेससाठी प्रतिकूल ठरली आहे. प्रफुल्ल गुडधे, रेखा बारहाते यांचे नाव समोर येत होते. या मतदारसंघातून कुणीही लढण्यासाठी तयार नसताना देशमुख यांनी हिंमत दाखविली.त्यांनी या अगोदर वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि २०१४ मध्ये काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर भाजप नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दक्षिण-पश्चिम नागपुरात त्यांचा म्हणावा असा हक्काचा मतदार कमी आहे. कॉंग्रेसची परंपरागत मतं येथे निश्चित आहे. मात्र अंतर्गत गटबाजीचे ग्रहण अजून सरलेले नाही. मतदारसंघ नवीन असल्यामुळे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करताना आशिष देशमुख यांची दमछाक होत आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे कॉंग्रेसची यंत्रणा खिळखिळी झाली आहे. त्यामुळेच काही प्रचारसभांमध्ये तर त्यांना स्वत: किल्ला लढवावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. अखेरच्या टप्प्यात मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.या मतदारसंघातून बसपचे विवेक हाडके हे उभे आहेत. मागील निवडणुकीत बसपला येथून तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती. हाडके हे या मतदारसंघातीलच असून त्यांच्या प्रचारात गर्दी दिसून येत आहे. तर वंचित बहुजन आघाडीतर्फे शहराध्यक्ष रवींद्र शेंडे हे उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारसभा घेऊन वातावरणनिर्मिती केली. या दोन्ही उमेदवारांच्या मतांचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. या मतदारसंघातून सर्वाधिक २० उमेदवार उभे आहेत. यात अपक्षांचादेखील भरणा आहे. आता प्रचाराचा अखेरच्या दिवसांत सर्वच जण पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. अशा स्थितीत मतदार कुणावर विश्वास टाकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम