शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : ईडी-सीडीचा आधार घेऊन भाजपाकडून मुस्कटदाबी : उदित राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:36 IST

विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला. उदित राज म्हणाले, सध्या देशाची आर्थिक स्थिती सर्वच क्षेत्रात प्रचंड खालावली आहे. ईडी, सीडी, भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चेवरच भाजपा निवडणुकीत उतरली आहे. पी. चिदंबरम यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात फक्त एक मौखिक आरोप आहे. त्याव्यतिरिक्त काहीच नाही. विपक्षातील सर्व नेत्यांच्या विरोधात ईडी आणि सीडीचा वापर होत आहे. मध्य प्रदेशात संपूर्ण नेटवर्क उघड झाले,ज्यात आमदार सरकारच्या विरोधात असतील त्यांना फसविण्याचा डाव होता. एकप्रकारे हे ब्लॅकमेलिंगच आहे.सावरकर यांना भारतरत्न देण्याची चर्चा सुरू आहे. हे सरकार त्यांना भारतरत्न देईलही. मात्र याच सावरकरांनी १३ ते १४ वेळा इंग्रजांकडे माफी मागितली होती, याचाही विचार व्हावा. इंग्रजांकडे माफी मागणाऱ्यांना भारतरत्न देण्याचा आग्रह होत असेल तर असा आग्रह करणारे खरे देशभक्त आहेत का, याचाही विचार व्हावा. भाजपाची मंडळी गांधींचे नाव घ्यायला लागली आहेत. मात्र त्यांना गोडसेही तेवढाच प्रिय आहे. ही दुहेरी नीती जनतेने ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले. देशातील परिस्थितीबद्दल ते म्हणाले, आदिवासी आणि दलितांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणे, या सरकारने सुरू केले आहे. आज देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढत आहे. सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. आरक्षण संपविण्याची तयारी सुरू आहे. दलितांना खासकरून प्रभावित केले जात आहे. खासगीकरण वाढविले जात आहे. रेल्वेसारखा विभाग विकायला काढला आहे. जी संसाधने काँग्रेसने उभी करून देश बळकट केला ती विकून भाजप हा देश चालवायला निघाली आहे. विकून असे किती दिवस काम चालविणार? भारताची अर्थव्यवस्था रसातळाला चालली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसा नाही. जीओ आणून बीएसएनएलची परिस्थिती घसरविली, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी माजी आमदार भगवतीप्रसाद चौधरी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता संजय दुबे उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mediaमाध्यमे