शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
4
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
5
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
6
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
9
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
10
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
11
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
12
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
13
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
14
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
15
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
16
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
17
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
18
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
19
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
20
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  

Maharashtra Assembly Election 2019  : नागपुरात मतदानासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:22 IST

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे१७ हजारावर निवडणूक कर्मचारी तैनात ८९ टक्के लोकांपर्यंत पोहोचल्या व्होटर स्लीप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकोश ओला, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.निवडणुकीसाठी एकूण १७ हजारावर निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांचे दोन प्र्रशिक्षण पूर्ण झाले असून, तिसरे प्रशिक्षण उद्या होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल ८९ टक्के मतदारांपर्यंत व्होटर स्लीप पोहोचलेल्या आहेत. मतदान केंद्रांवर मतदारंसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंध, अपंग दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरसह विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.यंदा मतदान केंद्रांवर बसण्याची व्यवस्थाहीमतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठी रांग असते. मतदारांना साधी बसायचीही सुविधा नसते, हे नेहमीचेच चित्र आहे. परंतु यंदा मतदान केंद्रांवर मतदारांना बसण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तशी माहिती दिली.मतदारांच्या माहितीसाठी ‘व्होटर गाईड’मतदान करण्याच्या प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ‘व्होटर गाईड’ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान कसे करावे, यासोबतच ईव्हीएम कसे काम करते, याची माहितीही यावर राहणार आहे.४४३ मतदान केंद्राच्या ठिकाणी वेब कास्टिंगजिल्ह्यात एकूण ४,४१२ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ४४३ ठिकाणी वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये त्या मतदान केंद्रावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर थेट लक्ष राहील. त्याचे केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राहील.एक्झीट पोलला मनाईनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक्झीट पोलला मनाई आहे. कुणीही एक्झीट पोल दाखविल्यास कारवाई केली जाईल.जमावबंदी कायदा लागूनिवडणूक प्रचार संपला आहे. आता केवळ घरोघरी जाऊन संपर्क करता येईल. परंतु पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नागपुरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीMediaमाध्यमे