शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांना महालक्ष्मी सरस  पावली; दहा दिवसात साडेचार कोटींची विक्री

By गणेश हुड | Updated: February 28, 2024 14:50 IST

या प्रदर्शनीच्या माध्यमातून  ग्रामीण भागातील महिलांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

नागपूर - पहिल्यांदाच नागपूर शहरात आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनी महिला बचत गटांना पावली आहे. दहा दिवसाच्या या प्रदर्शनीत ४ कोटी ५० लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन म्हणजे ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानाचा  महोत्सव आहे. राज्यातील उद्योगशील महिलांचा या प्रदर्शनात सहभाग होता.  

या प्रदर्शनीच्या माध्यमातून  ग्रामीण भागातील महिलांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. अशा आयोजनातून बचत गटातील महिलांच्या स्वयं रोजगाराला चालना मिळते. शासनातर्फे पहिल्यांदाच अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शन नागपूर येथे १७ ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले.  नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे  ४ कोटी ५० लाख रुपयांची विक्री झाल्याचे जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी पारितोषिक वितरणप्रसंगी  सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष,मुंबई यांच्या वतीने तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद नागपूर यांच्या समन्वयाने अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या  प्रसंगी प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, संदीप गोडशेलवार, राज्य अभियान व्यवस्थापक  रामदास धुमाळे, हरेश्वर मगरे, नितीन हर्चेकर, अभियान व्यवस्थापक विशाल जाधव, सागर गायकवाड,प्रियंका सादिगले, जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभिये, जिल्हा व्यवस्थापन सारंग कुंटे, सोनाली भोकरे, भाग्यश्री भोयर सुनिता निमजे,अल्पना बोस, यांच्यासह अधिकारी, जिल्हा समन्वयक व महिला उपस्थित होत्या.