शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाबोधी मुक्ती आंदोलन आता आणखी जोमाने

By admin | Updated: August 25, 2014 01:17 IST

आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे प्रकृती सुधारली आहे. आता पुन्हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू करीत आहोत. येत्या १९ सप्टेंबरपासून हे आंदोलन आणखी जोमाने पुढे नेण्यात येईल, अशी ग्वाही

भदंत सुरई ससाई : राज्य शासनाचे मानले आभार नागपूर : आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे प्रकृती सुधारली आहे. आता पुन्हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू करीत आहोत. येत्या १९ सप्टेंबरपासून हे आंदोलन आणखी जोमाने पुढे नेण्यात येईल, अशी ग्वाही बौद्ध धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.मागील दोन महिन्यांपासून भदंत ससाई यांची प्रकृती ढासळली होती. त्यांना पूर्वी केअर इस्पितळ आणि नंतर मुंबई येथील इस्पितळात भरती करण्यात आले होते. यावेळी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी ही पत्रपरिषद आयोजित केली होती. भदंत ससाई म्हणाले, इस्पितळात उपचार घेत असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी आस्थेने चौकशी केली. नितीन राऊत यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने उपचाराचा खर्च उचलला. यामुळे एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईत जाऊन उपचार घेता आले. अंथरुणावर खिळलो होतो, त्यावेळी विजय मेश्राम, डॉ. एस.के.गजभिये, अमित गडपायले, गौतम अंबादे, जगन तायडे, भन्ते धम्मबोधी यांनी सेवा केली. केअर इस्पितळातील डॉक्टरांसह इतर सर्व डॉक्टरांनी प्रकृतीची विशेष काळजी घेतली. ज्यांनी माझ्यासाठी बुद्धवंदना केली त्या सर्वांचे आभार मानतो. विशेषत: राज्य शासनाला धन्यवाद देतो. आता प्रकृती सुधारली आहे. यामुळे पुन्हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. पुढील महिन्यापासून हे आंदोलन आणखी जोमाने रेटण्याचा प्रयत्न राहील. पत्रपरिषदेत मेश्राम, गडपायले, डॉ. गजभिये, अंबादे, अशोक कोल्हटकर, संदीप कोचे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)