शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘महाबीज’ला आर्थिक स्वायत्तता देण्याची गरज!

By admin | Updated: August 9, 2014 02:04 IST

जे.पी.डांगे यांचे मत: महाबीजच्या कामाचा घेतला आढावा

अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला (महाबीज) आर्थिक आणि आस्थापनाविषयक स्वायत्तता देण्याची गरज आहे, असे मत राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. अकोल्यातील महाबीजच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. महाबीजमध्ये कार्यरत मनुष्यबळ कमी असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. महाबीजची वार्षिक उलाढाल आणि कामाची व्याप्ती लक्षात घेता, महाबीजला आर्थिक आणि आस्थापनाविषयक अधिक स्वायत्तता देण्यास हरकत नसल्याचे डांगे यांनी सांगितले. वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी यावेळी महाबीजच्या कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये महाबीजची वार्षिक उलाढाल, बियाणे निर्मिती, विक्रीबाबतच्या माहितीसह राज्यात महाबीजचे २३ प्रक्रिया केंद्र कार्यरत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मिळणारी मदत आणि बीटी कपाशीसह विविध नवीन प्रकल्पांची माहिती महाबीजच्यावतीने डांगे यांना देण्यात आली. महाबीजच्या कार्याबद्दल त्यांनी समाधानही यावेळी व्यक्त केले. या आढावा बैठकीला महाबीजचे महाव्यवस्थापक (प्रक्रिया व अभियांत्रिकी) विनोद काळपांडे,महाव्यवस्थापक (विपणन) राजेंद्र नाके, महाव्यवस्थापक (वित्त) संजय ठकराल, महाव्यवस्थापक (प्रशासन) आर.डी.काळे, विभागीय व्यवस्थापक (नियंत्रण व संशोधन) उमाकांत गावंडे, उपमहाव्यवस्थापक (प्रक्रिया) अनिल चोपडे, पुष्कर देशपांडे व इतर अधिकारी उपस्थित होते. *महाबीजची ५५0 कोटींची उलाढाल!४ २0१३-१४ या वर्षात खरीप व रब्बी हंगामात सोयाबीन, गहू, हरभरा व उडीद, धान इत्यादी बियाणे विक्रीतून महाबीजची वार्षिक उलाढाल ६0 कोटींची झाली आहे. ११ लाख क्विंटल बियाणे विक्रीतून ही उलाढाल झाली असून, त्यामधून महाबीजला जवळपास ६0 कोटींचा नफा झाल्याची माहिती राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांना यावेळी महाबीजच्या अधिकार्‍यांनी दिली.